द्रोणाचार्य
द्रोणाचार्य हे महान धनुर्धर होते. त्यांनी कौरव आणि पांडव यांना अस्त्र शस्त्र यांचे सर्व शिक्षण दिले. महाभारतानुसार द्रोणाचार्य हे देवगुरु बृहस्पती यांचे अंशावतार होते. महर्षी भारद्वाज हे त्यांचे वडील होते. द्रोणाचार्यांचा विवाह शरद्वान याची कन्या कृपी हिच्याशी झाला होता. महान योद्धा अश्वत्थामा हा त्यांचाच पुत्र होता. महान धनुर्धर अर्जुन हा द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य होता.
अर्जुनाला वरदान दिले होते
एकदा गुरु द्रोणाचार्य नदीत स्नान करत होते. त्याचवेळी अचानक त्यांना एका मगरीने पकडले. त्यांनी आपल्या शिष्यांना मदतीसाठी हाका मारल्या. तिथे दुर्योधन, युधिष्ठीर, भीम, दुष्यासन, इत्यादी बरेच शिष्य उभे होते, परंतु गुरूला संकटात बघून ते देखील घाबरून गेले होते. तेव्हा अर्जुनाने आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्या मगरीला मारून टाकले होते. अर्जुनाचे हे शौर्य बघून प्रसन्न झालेल्या द्रोणाचार्यांनी त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर होण्याचे वरदान दिले.