Get it on Google Play
Download on the App Store

पंडित भीमसेन जोशी

दहा ते बारा वर्षाचा एक मुलगा , भुकेने व्याकुळ होऊन रोज एका भजीपावच्या गाडीवर खाद्य पदार्थाचा वास घेत थांबायचा , त्या भजीपावच्या गाडीचा   मालक रामन्ना याने त्याला एके दिवशी  हटकले , " काय रे आज चार दिवस झाले पाहतोय , रोज इथे थांबतोस , काहीतरी काम कर , मी तुला खायला देईन !" , यावर तो मुलगा गप्पच बसला , यावर रामन्नाने त्याला विचारले ,"काय काम करू शकतोस ?" यावर त्या मुलाने उत्तर दिले , " मी फक्त गाण गाऊ शकतो !" , यावर रामन्नाने गाणे गाउन दाखव असे म्हंटले , मग त्या मुलाने एक सुंदर गाणे गाउन दाखवले , त्याच्या त्या सुरेल आवाजावर खुश होत रामन्नाने त्याला जेवण दिले .

हा नित्याचा क्रम झाला , काही दिवसांनी तो मुलगा तिथुन निघुन गेला . असेच बरेच वर्षे निघुन गेली . रामन्ना वय झाल्याने आता घरीच खाट धरून होते , त्यांची पत्नी त्यांची सेवा करत तिथेच बसून राहायची , परिस्थिति ही हलाखीची झाली होती . औषधपाण्याला ही पैसे नव्हते त्या वृद्ध जोडप्याकडे .... !!

इकडे तो मुलगा एक मोठा नामवंत गायक बनला होता , त्याच्या गायनाचा मोठा कार्यक्रम पार पडला , त्याला मानधन मिळाल पंचवीस हजार रुपये .... कार्यक्रम संपला , तो मुलगा कारमध्ये बसून थेट निघाला ते रामन्नाच्या घराकडे , त्याच्या गाडीच्या मागे सात आठ गाड्या , बघता बघता सर्व गाड्या एका झोपड़पट्टीत शिरले , रामन्नाच्या झोपड़ी समोर त्या मुलाची कार थांबली , तो मुलगा कार मधून थेट रामन्नाच्या खाटा जवळ जाऊन बसला , रामन्नाच्या बायकोने त्याला ओळखले नाही . त्या मुलाने आपल्या खिशातील त्याला मिळालेल्या मानधनाचे पाकिट जसेच्या तसे रामन्नाच्या बायकोच्या हातात दिले आणि तो तिथून डोळे पुसत बाहेर पडला , त्याच्या सोबतची सर्व मंडळी अवाक होऊन त्याच्याकडेच पहातं होती , इतका मोठा प्रसिद्ध गायक आणि अश्या घाणेरडया झोपडपट्टीत येतो काय , झोपडीत जातो काय ? , सर्व मानधन देतो काय ? आणि काही न बोलता डोळे पुसत बाहेर पडतो काय ?, कुणाला काही कळत नव्हते .

तो मुलगा आपल्या गाडीत बसताच , न राहवून त्याच्या मित्राने विचारले , हे सर्व काय ? , यावर त्या मुलाने उत्तर दिले , " जर या रामन्नाने मला जेवण दिले नसते तर कदाचित आज हा गायक तुम्हाला दिसलाच नसता , त्याने  माझे गाणे ऐकून मला जेवण दिले , दुसरा कोणी असता तर कदाचित गाण्याऐवजी दुसर काम सांगितल असत , जे मला जमलच नसत !!" ..... हा मुलगा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून , आपल्यां देशाचे भुषण , महागायक , स्वरभास्कर स्व. पंडित भीमसेन जोशी !