Get it on Google Play
Download on the App Store

देवता स्वरूप

विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील म्ह्तावाची संकल्पना म्हणून ओळखली जाते. विठोबा हा श्रीहरीचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्लाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते.

विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे 'चंद्रभागा' म्हणतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.

संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३व्या ते १७ व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्‍नड कवींनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत.