Get it on Google Play
Download on the App Store

युरोपची परिस्थिती

मी युरोपची परिस्थिती खुप जवळुन बघतोय..जर्मनी,इटली,स्पेन,पोलंड,स्विझर्लंड,फ्रान्स,नेदरलँड,ऑस्ट्रिया या देशांच्या न्यूज वर माझ बारीक लक्ष आहे..वेगवेगळ्या देशांमधील मित्रांशी संपर्क साधतोय..माझ्या कंपनी काम संदर्भातल्या डायरीवर मी काही गोष्टी लिहून ठेवतोय..त्यांचं काय चुकलं,त्या नंतर त्यांनी काय केलं हे सर्व मी बघतोय..बर्लिन तस माझं आवडत शहर पण आज ते पुर्ण स्तब्ध झालाय..आज ते काय परिस्थितीतुन जात आहे हे सर्व मी बघतोय..जे कोणी बाहेर फिरतांना दिसतील त्यांना 300-500€ (Euro) म्हणजे 24000-40000 पर्यंत दंड आकारला जातोय..घरातुन कोणी बाहेर पडायला तयार नाहीये..जर्मनीला काल 4600 पेशंट पॉझिटिव्ह सापडले..टोटल आता 20000 झाले..हात लावेल त्या जागेवर विषाणु बसले आहे असच समजा..घरा घरात कोरोनाचे पेशंट तयार झाले..आई बाप भाऊ बहीण बायको मुलगा मुलगी प्रियसी कोण कुठे ऍडमिट आहे,जिवंत आहे कि मेला हे सुद्धा कळायला त्यांना मार्ग राहिला नाहीये..जे मेले त्यांच्या घरच्यांनाही माहित नाही कि आपला बाप आई मुलगा मुलगी बायको मेले कोरोनात..हि परिस्थिती आपल्याकडे येऊ नये त्यामुळे मी महाराष्ट्रातील माझ्या मित्र परिवाराला वारंवार काळजी घेण्याची विनंती करतोय..युरोपची परिस्थिती सांगतोय..महाराष्ट्रापेक्षाही छोटे देश आहे आणि 3-4 कोटी लोकसंख्या आहे तरीही आज अशी भयानक परिस्थिती त्यांच्यावर आहे..आपल्या महाराष्ट्रात 13-15 कोटी लोकसंख्या आहे विचार करा आपली काय अवस्था होईल..असं बोलायला नाही पाहिजे पण विचार करा म्हणुन सांगतो जर लोकांनी बंद पाळला नाही तर आपली अवस्था यांच्यापेक्षाही बिकट होईल,दुर्दैवाने कोरोनात कोणी मृत्युमुखी पडलंच तर घरातल्या लोकांना त्याच तोंडही बघता येणार नाही आणि अंत्यसंस्कारही करता येणार नाही मित्रांनो..आपल्याकडील लोकांना अजून परिस्थितीच गांभीर्य नाहीये..म्हणुन सांगतो घरी शांत बसा..पाया पडून हात जोडून विनंती करतो..मी खूप कोरोनाला खुप seriously घेतोय,कारण मी सगळं लाईव्ह बघतोय कसे हे कोरोनाच्या विळख्यात सापडत गेले..युरोपियन लोकांचं काय चुकलं यांचं सांगायचं झालं तर अतिशहाणपणा आणि मुजोरपणा नडला..प्रशासनाने सर्व खबरदारी घेतली होती,जनतेला सतर्क केलं होत,हॉस्पिटल सज्ज केले होते..पण जेव्हा प्रशासन सांगत होत कि घराबाहेर पडू नका तेव्हा यांनी ऐकलं नाही हे पब,क्लब,थिएटर,बीच वर जाऊन बसले..हे लोक स्वभावाने चांगले आहे पण यांच्यावर कोणी जबरदस्ती केलेली यांना आवडत नाही..हे यांच्या मनाप्रमाणे ऐकणारे लोक..बापाचं ऐकत नाही तेव्हा प्रशासन लांबच..त्याचेच परिणाम आज हे भोगत आहे..सांगायला माझ्याकडे खूप डेटा आहे..सर्व नोट करतोय..बघतोय अनुभवतोय..पण याच अनुभवाचा फायदा माझ्या महाराष्ट्राला व्हावा म्हणुन मी तुमच्यापुढे हे सर्व मांडतोय..कधी कधी वाटत लाईव्ह येऊन सगळी परिस्थिती सांगावी..पण काही कारणास्तव मी तस करू शकत नाही..मी हे सगळं सांगतोय याच कारण एवढंच कि या देशांची एक चूक झाली आणि ती पुढे कशी घातक झाली हे मी अनुभवतोय आणि ती परिस्थिती महाराष्ट्रावर येऊ नये म्हणुन मी सगळं सांगतोय जीव तोडुन..ऐका माझं..तुमच्या आई वडील बायको मुलांसाठी तरी ऐका..शिवरायांनी आणि अनेक मावळ्यांनी रक्त सांडुन उभा केलेला आपला महाराष्ट्र आपल्यांना जगवायचा आहे मित्रांनो..सगळ्या एअरलाईन्स एअरपोर्ट बंद झाले आहे,तिकीट बुकिंग होत नाहीये..मला भारतात काही दिवस येताही येणार नाही,पुढे काय होईल हे सर्व मला दिसतंय तरीही माझं मन खंबीर आहे अजुन,कारण लढण्याची प्रेरणा छत्रपती आणि बाळासाहेब ठाकरेंपासून घेतली आहे..रायगडाची माती कपाळाला लागली आहे..मी इथली परिस्थिती का जीव तोडुन तुम्हाला सांगतोय हे लक्षात घ्या..आणि सतर्क वागा..एक बर वाटलं अनेकांचे मेसेज येत आहे कि तुझ्या पोस्ट मुळे आम्हाला कोरोनाच गांभीर्य कळलं,कळतंय..घरी बसा..बंद पाळा..आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन प्रशासनाला मदत करा..

या जागतिक युद्धात माझ्या महाराष्ट्राला जिंकावण्यासाठी,टिकवण्यासाठी माझं गवताच्या काडी इतकं जरी योगदान राहील तर जन्माला येऊन आयुष्य सार्थकी लागल्याचं समाधान असेल..