लग्न आणि आपण
कुत्रा घ्यावा कि न घ्यावा ह्या निर्णयाप्रत येण्यासाठी खूप विचार करावा लागतो. म्हणजे दोन्ही बाजू पारखून आपल्यासाठी कुठली चांगली आहे हे नेमके कळावे लागते. कुत्रा पाळण्याचे अनेक फायदे आहेत, उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिकांना कुत्रे सोबत देतात, चोर पासून संरक्षण करतात पण दुसरी बाजू बघायला गेल्यास कुत्र्यांची निगा राखावी लागते, त्यांना वेळोवेळी बाहेर घेवून जावे लागते, त्यांची शी शू साफ करावी लागते इत्यादी.
लग्न हा सुद्धा तसाच एक निर्णय असतो. लग्न करावे कि करू नये, ह्या प्रश्नाचे उत्तर बहुतेक वेळा करावे असेच असते. पण लग्नाचा स्पष्ट फायदा कुणीच सांगत नाही. एकटेपणाची भीती हा एक महत्वाचा मुद्दा असतो पण बहुतेक विवाहित, मी लग्न न केले असते तर चांगले झाले असते असे आयुष्यभर म्हणत असतात. काही जन मोक्याच्या वेळी धाडस दाखवतात आणि लोक त्यांना समर्थ म्हणू लागतात. काही जणांना नंतर पश्चात्ताप होतो व ते बुद्ध होतात. पण न्यानेश्वाराच्या वडिलां प्रमाणे काही जन संन्यास घेवून नंतर लग्न करतात व समाजाची अवहेलना सोसतात. समाज सुद्धा मजेदार असतो, पलायन केल्याची स्तुती व परत येणार्यास बडगा.
लग्नाचा फायदा हा भौतिक नसून केवळ ऐक आशा असते. आशा हीच कि कुठल्याही क्षणी कोणी तरी आपल्या सोबत असेल. मी पडलो तर चट्ट करून हाथ देयील, सकाळी चहा करून देयील , आंघोळीचे पाणी गरम करून देयील ह्या सगळ्या आशा पुरुषाला ओढत नेवून लग्नाच्या बेडीत बंदिस्त करतात.
लग्न होते. लग्न झाल्या झाल्या गौतम बुद्ध घर सोडून का गेला असावा ह्या प्रश्नाचे उत्तर उमजायला लागते. सोमवार ते शुक्रवार काम करून आपण शनिवारी सकाळ पर्यंत मस्त पैकी झोप काढावी हे सत्य भूतकाळातील ऐक सुखद घटना बनते. त्या nostalgia मध्ये रमत “शनिवारी उठल्या नंतर समोर गरम गरम चहा असावा” हि आशा ऐक स्वप्न बनून जाते. प्रत्यक्षात आपण कडक इस्त्रीचे कपडे (इस्त्री आपल्यालाच करावी लागते) घालून, हातात भेटवस्तू (आपल्या खिशाला चाट पडून घेतलेली) व चेहऱ्यावर कृत्रिम हसू घेवून , हिच्या मामाच्या मुलीच्या छोट्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला ऐक प्लास्टिकच्या खुर्चीवर बसलेलो असतो.
तिकडे पलीकडे हिचीच कोणी तरी दूरची, जिला आपण मराठीत कझिन (cousin) म्हणतो ती आपल्या केसाची लाट सावरीत असते. अनिल कुंबळेच्या हातून कॅच सुटल्यावर तो जसा बॉल कडे बघतो तश्या नजरेने आपण तिच्या कडे बघत असतो. ती सोडून इतराकडे आपली हि ओळख करून देते. ह्यांना ओळखला का? हा प्रश्नाने सुरुवात होवून anthropology चा research paper वाटावा अश्या आशयाने शेवटी ती ओळख समाप्त होते. Cousin, uncle ह्या vague शब्दा साठी आपण मनोमन विन्ग्रजीचे आभार मानतो.
चाणाक्ष लोक “आपण ओळखला का ह्यांना?” हा प्रश्नावर , जर ती व्यक्ती प्रौढ असली तर चट्ट करून “हे ते तुझे Uncle ना ? आमच्या लग्नात तर आले होते. ” व जरा तरुण असली तर uncle चे रुपांतर cousin मध्ये करून वेळ मारून नेतात. हा शनिवारी नाही तरी पुढल्या शनिवारी तरी नक्की आपण झोप काढायचीच असे मनावर ठसवीत बसतात.
शनिवारी संध्याकाळी आपले एका काळाचे मित्र फोन करतात. अरे काल ना आपण Bristros मध्ये गेलो होतो. काल तिकडे couple entry नव्हती ना म्हणून, आपल्या दुखावर मीठ चोळतात. पूर्वी आपण की की बघायचो आता अगदी मल्लिका शेरवत चा picture बघायला guilty feel होवू लागते.
हळू हळू आपण हार मनात जातो. “संसारात रमणे” हे त्याला दिलेले गोंडस नाव असते. आपली क्रिकेटची बँट, जिला आपण एव्हडे जपत आलेलो असतो ती हरवते, कविता सुचत नाहीत , कामात बदल रुचत नाही. जिला आपण सडपातळ म्हणून पसंत केलेले असते तिचे वाढलेले वजन आता जाणवत नाही कारण आपले पोट सुद्धा सुटत चाललेले असते.
आता आपण स्वतः हून सकाळी उठून अंघोळ करतो, स्वतः चहा करून पितो. Getz साठी जमवलेला आपला बँक balance De bears Diamon necklace साठी गेला तरी आपण स्तिथप्रग्य असतो.
मागे वळून बघण्यात कधी nostalgia तर कधी खंत वाटू लागते. जुनी मैत्रीण , जिच्या बरोबर आपण भेल पुरी खायचो ती कधी तरी मॉल मध्ये दिसते पण आपण “अजून सुद्धा तशीच दिसतेय” असे मनात म्हणत नजर चुकवून जातो, कारण हिची नजर आपल्यावरच असते. काही कोलेज कुमारी हसत खिदळत जातात, आपण तिकडे बघत नाही. आपण उगाच मोबयील शी चाळा करत बसतो. चित्रपट गृहात Dark Knight, Angels and Demons ऐवजी प्रियादर्शन चा ऐक विनोदी चित्रपट बघून आपण चक्क हसतो.
कधीतरी आपण आईला भेटायला जातो. नक्की की बोलावे हा प्रश्न पडतो. तिला ५ हजाराचा चेक देवून यावे असे वाटते, तिला काही तरी सोने द्यावे असे वाटते. धाडस होत नाही. आई म्हणते जेवून जा , होय म्हणावेसे वाटते पण आपण काही तरी सबब सांगून निसटतो.
आपण दुखी असतो का? ह्या प्रश्नाचे उत्तर देणे आपल्याला जमत नाही. टी वी बघत असताना हि आत भाजी करपवत असते. आपल्यात जो बदल घडून आला त्याच्या साठी तिच्यावर रागवावे, तिला ओरडून सांगावेसे वाटते. तेवढ्यात तिने आपल्या सगळ्या वाढदिवसाला न विसरता आवर्जून दिलेली ग्रीटिंग कार्ड्स मनासमोर तरळून जातात. जरा ताप की आला तिने डॉक्टरला phone केलेला आठवतो. ऑफिस चा राग मी तिच्यावर काढलेला तिने निमूट सहन केलेला असतो. कधीतरी टी आपल्याला बिलगून हसमसून रडलेली आपल्याला आठवते , कारण आठवत नाही पण तिच्यावर रागवावे असे मुळीच वाटत नाही.