पुणेरी विनोद
पुणेरी : ओ दुकानदार, केळी कशी दिली राव?
दुकानदार : एक रुपयाला एक
पुणेरी : काय तरी काय. साठ पैशाला देता का बोला....
दुकानदार : अहो साठ पैशात तर त्याचं साल फक्त येईल.
पुणेरी : ठीक आहे. मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवायचं केळं द्या पाहू.
एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो,
तो nurse ला विचारतो, खायला काय आहे?
nurse : पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा: चायला! परत पुण्यात जन्माला आलो....!!
पुणेरी boyfriend -
मुलगा: I'll climb the tallest mountain, swim the deepest sea, walk
on fire just for you.
मुलगी: wow किती romantic...! तू मला आत्ता भेटायला येशील का?
मुलगा: आत्ता लगेच नको, पाऊस पडतोय, आई ओरडेल...!
एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..."
.
१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया...!"
स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
.......
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
...तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !
स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
.
....
.
पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??