मासिक पाळी एक आश्चर्य
मानवी स्त्रियांची मासिक पाळी हे एक आश्चर्य आहे. मानव अनेक बाबतीत इतर जनावरां प्रमाणे असला तरी मासिक पाळी इतर जनावरांत इतकी त्रास दायक असत नाही. मानवा शिवाय माकड,हत्ती आणि काही प्रकारची वटवाघुळे ह्यांना पाळी येते.
पोटात वाढणार्या गर्भाला सुरक्षित कुशन मिळावे म्हणून गर्भाशायंत एक लेयर तयार होते. गर्भधारणा न झाल्यास हे लेयर बहुटेल जनावरांत पुन्हा शरीरांत शोषून घेतले जाते पण मानवांत ते रक्तस्त्राव म्हणून शरीरा बाहेर फेकले जाते. काही जनावरांत फक्त गर्भधारणा झाल्यावरच हे लेयर तयार होते.ह्या विषयावर आज पर्यंत रिसर्च चालू आहे. धार्मिक रूढी, गैरसमजुती मुळे ह्या विषयावर जास्त रिसर्च झाला नव्हता पण आता तो होत आहे.
माहात्मा गांधी ह्यांना सुद्धा स्त्रियांच्या मासिक पाळी विषयी गैर समजुती होत्या. त्यांच्या मते स्त्रियांच्या मनात अनेक विकार असतात आणि हे विकार वाढले कि रक्तस्त्राव म्हणून ते बाहेर फेकले जातात.