Get it on Google Play
Download on the App Store

अब्दुल करीम तेलगी

 

अब्दुल करीम तेलगी हा स्जायाफ्ता नकली स्टम्प पेपर बनवणारा होता. त्याने नकली स्टम्प पेपर बनवून भरतात खूप पैसे कमवले. त्याने नार्को एनालिसिस मध्ये ६०० अरबच्या स्टम्प पेपर घोटाळ्यात शरद पवार आणि छगन भुजबळ यांसारख्या बड्या नेत्यांचीही नावे घेतली होती. त्याने ३०० लोकांना एजंटच्या स्वरुपात उभे केले. ज्यांनी नकली स्टम्प पेपर बँक, इन्सुरन्स कंपनी आणि शेअर विकणाऱ्या कंपनीला विकले. १७ जानेवारी २००६मध्ये तेलगी आणि त्याच्या साथीदारांना ३० वर्षांची शिक्षा झाली. २८ जून २००७मध्ये तेलगीला आणखी एका गुन्ह्यासाठी १३ वर्षाची शिक्षा झाली.