डॉनेल बतिस्ता
डॉ. रिचर्ड बतीस्ता याने डॉनेल बतिस्ता सोबत १९९० मध्ये विवाह केला. त्या वेळपर्यंत डॉनेल चे दोन किडनी ट्रांसप्लांट झाले होते. परंतु २००१ मध्ये ते फेल गेले. तेव्हा रिचर्डने डॉनेलला आपली किडनी दिली. बरी झाल्यानंतर तिने नर्सिंग ची डिग्री घेतली. यानंतर तिचे वागणे बदलत गेले. दोघांमध्ये दुरावा वाढला आणि पतीने आपल्या किडनीसाठी डॉनेल वर १.५ दशलक्ष डॉलर ची केस केली.