Get it on Google Play
Download on the App Store

पुलाऊ उबिन बार्बी

http://az795576.vo.msecnd.net/bh-uploads/2015/09/05_Pulau_Ubin_Barbie-1200x800.jpg

बार्बी ही संपूर्ण जगात एक प्रसिद्ध बाहुली आहे. इतकी प्रसिद्ध की एका मृत मुलीने स्वतःच्या थडग्यातून तिच्यासाठी बार्बी विकत घेण्याची विनंती केली होती.

पहिल्या जागतिक युद्धाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहतीतील अनेक परदेशी लोकांवर अविश्वास दाखवला आणि ब्रिटीश लष्कराने १९१४ साली सिंगापूरमध्ये एका जर्मन जोडप्याची हेर म्हणून तपासणी सुरु केली. त्या जोडप्याला अटक करण्यात आली मात्र त्यांची तरुण मुलगी जणू एका सुळक्यावरून पडून मरण्यासाठी निसटली. तिच्या स्मरणार्थ एक समाधी पुलाऊ उबिनच्या रहिवास्यांतर्फे बांधण्यात आली, ज्यात नाजूक मातीच्या वेदीत जिच्यात त्या मुलीचे केस आणि एक क्रूसही ठेवण्यात आले.

ती बार्बीची बाहुली तिथे २००७ सालापासून आहे. पुलाऊ उबिनच्या एका माणसाला सलग तीन रात्री एकच स्वप्न पडत होते ज्यात एक गोरी मुलगी त्याला एका बार्बी असलेल्या खेळण्याच्या दुकानात घेऊन जात होती. तिसऱ्या रात्रीनंतर तो माणूस दिवसा त्या दुकानात गेला आणि स्वप्नात पाहिलेली तीच बाहुली दिसली. त्याने ती बाहुली विकत घेऊन तिच्या समाधीवरच्या अस्थिपात्राऐवजी ठेवली. तिथले रहिवासी आणि पर्यटक आता तिथे भेट देतात आणि त्या मुलीचा आत्मा त्यांच्यासाठी चांगलं नशीब घेऊन येईल किंवा त्यांना निरोगी करेल या आशेने लिपस्टिक, अत्तर यांसारख्या गोष्टी दान म्हणून देतात.

जर तुम्ही सिंगापूरला नाही जाऊ शकलात तरी तुम्ही मॅटेलचं “शापित सौंदर्य” संग्रही ठेवण्यासाठी विकत घेऊ शकता पण वाईट बाब म्हणजे ती बाहुली फक्त भुतासारखी सजवली गेली आहे, तिच्यात अगदी थोडी, जवळजवळ शून्य अनैसर्गिक शक्ती आहे.