श्री निवृत्ति महाराज हरिपाठ
१
हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं । अखंड श्रीपती नाम वाचे ॥ १॥
रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती । नित्य नामें तृप्ती जाली आम्हां ॥ २॥
नामाचेनि स्मरणें नित्य पैं सुखांत । दुजीयाची मात नेणो आम्ही ॥ ३॥
निवृत्ति जपतु अखंड नामावळी । हृदयकमळीं केशीराज ॥ ४॥
२
हरिविण चित्तीं न धरीं विपरीत । तरताती पतित रामनामें ॥ १॥
विचारुनी पाहा ग्रंथ हे अवघे । जेथें तेथें सांग रामनाम ॥ २॥
व्यासादिक भले रामनामापाठीं । नित्यता वैकुंठीं तयां घर ॥ ३॥
शुकादिक मुनि विरक्त संसारीं । रामनाम निर्धारीं उच्चारिलें ॥ ४॥
चोरटा वाल्मीकि रामनामीं रत । तोही एक तरत रामनामीं ॥ ५॥
निवृत्ति साचार रामनामी दृढ । अवघेचि गूढ उगविले ॥ ६॥
३
हरिमार्ग सार येणेंचि तरिजे । येरवीं उभिजे संसार रथ ॥ १॥
जपतां श्रीहरी मोक्ष नांदे नित्य । तरेल पैं सत्य हरि नामें ॥ २॥
काय हें ओखद नामनामामृत । हरिनामें तृप्त करी राया ॥ ३॥
निवृत्ति साचार हरिनाम जपत । नित्य हृदयांत हरी हरी ॥ ४॥
४
एकेविण दुजें नाहीं पैं ये सृष्टी । हें ध्यान किरीटी दिधलें हरी ॥ १॥
नित्य या श्रीहरि जनीं पैं भरला । द्वैताचा अबोला तया घरीं ॥ २॥
हरीविणें देवो नाहीं नाहीं जनीं । अखंड पर्वणी हरी जपतां ॥ ३॥
निवृत्ति साकार हरिनाम पाठ । नित्यता वैकुंठ हरिपाठ ॥ ४॥
५
जपतां कुंटिणी उतरे विमान । नाम नारायण आलें मुखा ॥ १॥
नारायण नाम तारक तें आम्हां । नेणों पैं महिमा अन्य तत्त्वीं ॥ २॥
तरिले पतित नारायण नामें । उद्धरिले प्रेमें हरिभक्त ॥ ३॥
निवृत्ति उच्चार नारायण नाम । दिननिशी प्रेम हरी हरी ॥ ४॥
६
एक तत्त्व हरि असे पैं सर्वत्र । ऐसें सर्वत्र शास्त्र बोलियलें ॥ १॥
हरिनामें उद्धरे हरिनामें उद्धरें । वेगीं हरि त्वरें उच्चारी जो ॥ २॥
जपता पैं नाम यमकाळ कांपे । हरी हरी सोपें जपिजे सुखें ॥ ३॥
निवृत्ति म्हणे हरिनामपाठ जपा । जन्मांतर खेपा अंतरती ॥ ४॥
७
गगनींचा घन जातो पैं वारेन । अवचिता पतन अधोपंथें ॥ १॥
अध ऊर्ध्व हरि भाविला दुसरी । प्रपंचबोहरी आपोआप ॥ २॥
निवृत्ति म्हणे जन हरीचें स्वरूप । कळाचें पैं माप हरिनाम ॥ ३॥
८
सृष्टीच्या संमता सुरतरु तरु । बोलिला विस्तारु धर्मशास्त्रीं ॥ १॥
नेघों हें तरु प्रपंचपरिवारु । प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आम्हा ॥ २॥
निवृत्ति निवांत हरीच सेवित । दो अक्षरीं उचित इंद्रिया ॥ ३॥
९
सर्वांभूतीं दया शांती पैं निर्धार । योग साचार जनीं इये ॥ १॥
न लगे मुंडण काया हें दंडणें । अखंड कीर्तन स्मरे हरी ॥ २॥
शिव जाणें जीवीं रक्षला चैतन्य । हे जीवीं कारुण्य सदा भावीं ॥ ३॥
गगनीं सूर्य तपे अनंत तारा लोपे । एकची स्वरूपें आत्मा तैसा ॥ ४॥
उगवला कळीं उल्हासु कमळीं । तैसा तो मंडली चंद्र लेखा ॥ ५॥
निवृत्तिमंडळ अमृत सकळ । घेतलें रसाळ हरिनाम ॥ ६॥
१०
जयाचेनि सुखें चळत पैं विश्व । नांदे जगदीश सर्वा घटीं ॥ १॥
त्याचें नाम हरी त्याचें नाम हरी । प्रपंचबोहरी कल्पनेची ॥ २॥
शांति त्याची नारी प्रकृति विकारी । उन्मनी बोवरी हृदयांतु ॥ ३॥
निवृत्तिदेवीं साधिली राणीव । हरपले भाव इंद्रियांचे ॥ ४॥
११
हरीविण भावो वायांचि संदेहो । हरि देवो देवो आहे सत्य ॥ १॥
हरी हरी वाचे ऐसें जपा साचें । नाहीं त्या यमाचे मोहजाळ ॥ २॥
हरीविण सार नाहीं पैं निर्धार । हरिविण पार न पाविजे ॥ ३॥
निवृत्ति श्रीहरि चिंती निरंतरीं । हरि एक अंतरीं सर्वीं नांदे ॥ ४॥
१२
ध्यान धरा हरी विश्रांति नामाची । विठ्ठलींच साची मनोवृत्ति ॥ १॥
ध्यानेविण मन विश्रांतिविण स्थान । सूर्याविण गगन शून्य दिसे ॥ २॥
नलगे साकार विठ्ठल मनोवृत्ति । प्रपंच समाप्ति ती अक्षरीं ॥ ३॥
निवृत्ति समता विठ्ठल कीर्तन । करितां अनुदीन मन मेळे ॥ ४॥
१३
प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज । आम्हां बोलता लाज येत सये ॥ १॥
काय करूं हरी कैसां हा गवसे । चंद्रसूर्य अंवसे एकसूत्र ॥ २॥
तैसें करूं मन निरंतर ध्यान । उन्मनी साधन आम्हां पुरे ॥ ३॥
निवृत्ति हरिपाठ नाम हेंचि वाट । प्रपंच फुकट दिसे आम्हां ॥ ४॥
१४
लटिका संसार वाढविसी व्यर्थ । विषयाचा स्वार्थ क्षणें करीं ॥ १॥
नको शिणों दुःखे का भरिसी शोकें । एकतत्त्वें एकें मन लावीं ॥ २॥
लावीं उन्मनीं टाळी टाळिसी नेई बाळी । अखंड वनमाळी हृदयवटी ॥ ३॥
निवृत्ति चपळ राहिला अचळ । नाहीं काळ वेळ भजतां हरी ॥ ४॥
१५
कल्पना काजळी कल्पिले कवळी । कैसेनि जवळीं देव होय ॥ १॥
टाकी हे कल्पना दुरित वासना । अद्वैत नारायणा भजें कां रे ॥ २॥
मोहाच्या जीवनीं नको करूं पर्वणी । चिंती कां आसनीं नारायण ॥ ३॥
निवृत्ति अवसरु कृष्णनाम पैं सारु । कल्पना साचारु हरी झाला ॥ ४॥
१६
मोहाचेनि देठें मोहपाश गिळी । कैसेनि गोपाळीं सरता होय ॥ १॥
मोहाचेनि मोहनें चिंतितां श्रीहरी । वाहिजु भीतरीं अवघा होय ॥ २॥
दिननिशीं नाम जपतां श्रीहरीचें । मग या मोहाचें मोहन नाहीं ॥ ३॥
निवृत्ति आगम मोहन साधन । सर्व नारायण एका तत्त्वें ॥ ४॥
१७
तिमिरपडळें प्रपंच हा भासे । झाकोळला दिसे आत्मनाथ ॥ १॥
हरीविण दुजें चिंतितां निभ्रांत । अवघेंचि दिसत माया भ्रम ॥ २॥
सांडूनि तिमिर सर्व नारायण । हेंचि पारायण नित्य करी ॥ ३॥
निवृत्ति सज्जन अवघा आत्मराज । एकतत्त्व बीज नाम लाहो ॥ ४॥
१८
प्रवृत्ति निवृत्ति या दोन्ही जनीं । वनीं काज करुनी असती ॥ १॥
नारायण नाम जपतांचि दोन्ही । एकतत्त्वीं करणी सांगिजे गुज ॥ २॥
आशेचे विलास गुंफोनिया महिमा । सत्त्वीं तत्त्व सीमा निजज्ञाने ॥ ३॥
निवृत्ति तत्त्वतां मनाचे मोहन । नित्य समाधानें रामनामें ॥ ४॥
१९
क्षेत्राचा विस्तार क्षेत्रज्ञवृत्ति । अवघी हे क्षिती एकरूपें ॥ १॥
शांति दया पैसे क्षमा जया रूप । अवघेची स्वरूप आत्माराम ॥ २॥
निंदा द्वेष चेष्टा अभिमान भाजा । सांडूनियां भजा केशवासी ॥ ३॥
निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्त । अवघींच समस्त गिळियेलीं ॥ ४॥
२०
आम्ही चकोर हरि चंद्रमा । आम्ही कळा तो पौर्णिमा ॥ १॥
कैसा बाहिजु भीतरी हरी । बिंब बिंबला एक सूत्रीं ॥ २॥
आम्ही देही तो आत्मा । आम्ही विदेही तो परमात्मा ॥ ३॥
ऐक्यपणें सकळ वसे । द्वैतबुद्धी कांहीं न दिसे ॥ ४॥
निवृत्ति चातक इच्छिताहे । हरिलागीं बरें तें पाहे ॥ ५॥
२१
ज्याचे मुखीं नाम अमृतसरिता । तोचि एक पुरता घटु जाणा ॥ १॥
नामचेनि बळे कळिकाळ आपणा । ब्रह्मांडा येसणा तोचि होय ॥ २॥
न पाहे तयाकडे काळ अवचिता । नामाची सरिता जया मुखीं ॥ ३॥
निवृत्ति नामामृत उच्चारी रामनामे । नित्य परब्रह्म त्याचे घरीं ॥ ४॥
२२
नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥ १॥
रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचे । दहन पापाचें एका नामें ॥ २॥
ऐसा तो नित्यता पुढे तत्त्व नाम । नाहीं तयासम दुजें कोणी ॥ ३॥
निवृत्ति अव्यक्त रामनाम जपे । नित्यता पैं सोपें रामनाम ॥ ४॥
२३
अखंड जपतां रामनाम वाचे । त्याहूनी दैवाचे कोण भूमी ॥ १॥
अमृतीं राहिले कैचें मरण । नित्यता शरण हरिचरणा ॥ २॥
नाममंत्र रासी अनंत पुण्य त्यासी । नाहीं पैं भाग्यासी पार त्याच्या ॥ ३॥
निवृत्ति म्हणे सार रामनाम मंत्र । कैंचा त्यासी शत्रु जिती जनीं ॥ ४॥
२४
नाम नाहीं वाचे तो नर निर्दैव । कैसेनि देव पावेल तया ॥ १॥
जपे नाम वाचें रामनाम पाठें । जाशील वैकुंठे हरी म्हणता ॥ २॥
न पाहे पैं दृष्टीं कळिकाळ तुज । रामनाम बीज मंत्रसार ॥ ३॥
निवृत्ति म्हणे नाम जपावें नित्यता । आपणचि तत्त्वतां होईल हरी ॥ ४॥
२५
नामाचेनि बळें तारिजे संसार । आणिक विचार करूं नको ॥ १॥
नाम जप वेगीं म्हणे हरी हरी । प्रपंच बोहरी आपोआप ॥ २॥
नित्यता भजन देवद्विज करी । नाम हे उच्चारि रामराम ॥ ३॥
निवृत्ति जपतु राम राम वाचे । दहन पापाचें आपोआप ॥ ४॥