Get it on Google Play
Download on the App Store

सद्‍गुरू - जुलै ११

सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते . सरकारच्या हातात सर्व सत्ता असते , आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका खात्याकडे एकेक कामगिरी सोपविलेली असते . कायद्याला धरुन जोपर्यंत ते खाते आपले काम करीत असते , तोपर्यंत सरकार त्यात ढवळाढवळ करीत नाही ; फक्त क्वचित प्रसंगी आणि विशेष कारणांमुळेच , हस्तक्षेप करुन सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते , आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते . तोच नियम इथेही लागू आहे . प्रापंचिक बाबतीत ‘ प्रारब्ध ’ हे एक खाते आहे , त्याचा संबंध देहापुरताच असतो . प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बर् ‍ यावाईट गोष्टी भोगाव्या लागतात . सत्पुरुष होता होईल तो त्यांत ढवळाढवळ करीत नाही . फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिताच जर जरुर असेल , तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करील . पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते . आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून , त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरुर असते . हा अडथळा अनेक प्रकारचा असतो . एक म्हणजे , त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे ; दुसरे , दुसर् ‍ याला अमुक एक दिवसात साधले , मला अजून का साधत नाही , असा विचार मनात येणे ; आणि तिसरे , सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे . थोडक्यात म्हणजे , एकदा संताच्या पायावर डोके ठेवल्यावर , आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून , प्रपंचात घडणार् ‍ या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडताहेत अशी भावना ठेवून , आपले कर्तव्य करीत , त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे , हाच खरा मार्ग आहे .

संताच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही ; त्याचा देह आमचे काम करीतच नाही . तो परमात्मस्वरुप आहे ही जी आपली भावना , ती आपले काम करते . संत अत्यंत दयाळू असतात . सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो . म्हणून , सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले , तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच असतो . म्हणून , आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरुन गेलो , तर ते योग्य नव्हे . सत्पुरुषाला त्याच्या लक्षणांवरुन ओळखता येणार नाही . पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात , त्यांच्या पलीकडे संत असतो . त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम आवश्यक आहे . भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे . ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा !

ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास

स्तोत्रे
Chapters
सद्‍गुरू - जुलै १ सद्‍गुरू - जुलै २ सद्‍गुरू - जुलै ३ सद्‍गुरू - जुलै ४ सद्‍गुरू - जुलै ५ सद्‍गुरु - जुलै ६ सद्‍गुरु - जुलै ७ सद्‍गुरु - जुलै ८ सद्‍गुरु - जुलै ९ सद्‍गुरू - जुलै १० सद्‍गुरू - जुलै ११ सद्‍गुरू - जुलै १२ सद्‍गुरू - जुलै १३ सद्‍गुरू - जुलै १४ सद्‍गुरू - जुलै १५ सद्‍गुरू - जुलै १६ सद्‍गुरू - जुलै १७ सद्‍गुरू - जुलै १८ सद्‍गुरू - जुलै १९ सद्‍गुरू - जुलै २० सद्‍गुरू - जुलै २१ सद्‍गुरू - जुलै २२ सद्‍गुरू - जुलै २३ सद्‍गुरू - जुलै २४ सद्‍गुरू - जुलै २५ सद्‍गुरू - जुलै २६ सद्‍गुरू - जुलै २७ सद्‍गुरू - जुलै २८ सद्‍गुरू - जुलै २९ सद्‍गुरू - जुलै ३० सद्‍गुरू - जुलै ३१