आरंभी वंदीन अयोध्येचा
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ।
भक्ताचीया काजा पावत असे ॥१॥
पावत असे महासंकटी निर्वाणी ।
रामनाम वाणी उच्चारीत ॥२॥
उच्चारिता राम होय पाप चर ।
पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥
पुण्यभूमी पुण्यवंतासीं आठवे ।
पापीयानाठवे कांहीं केल्या ॥४॥
कांहीं केल्या तुझे मन पालटेना ।
दास ह्मणे जन सावधान ॥५॥
भक्ताचीया काजा पावत असे ॥१॥
पावत असे महासंकटी निर्वाणी ।
रामनाम वाणी उच्चारीत ॥२॥
उच्चारिता राम होय पाप चर ।
पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥
पुण्यभूमी पुण्यवंतासीं आठवे ।
पापीयानाठवे कांहीं केल्या ॥४॥
कांहीं केल्या तुझे मन पालटेना ।
दास ह्मणे जन सावधान ॥५॥