भाव तोंचि देव
भाव तोंचि देव भाव तोंचि देव ।
ये अर्थी संदेह धरूं नका ॥१॥
भाव भक्ति फळे भावें देव मिळे ।
निजभावें सोहाळे स्वानंदाचे ॥२॥
भावचि कारण भावचि कारण ।
यापरतें साधन नाहीं नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं भावाच्या आवडी ।
मनोरथ कोडी पुरती तेथें ॥४॥
ये अर्थी संदेह धरूं नका ॥१॥
भाव भक्ति फळे भावें देव मिळे ।
निजभावें सोहाळे स्वानंदाचे ॥२॥
भावचि कारण भावचि कारण ।
यापरतें साधन नाहीं नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं भावाच्या आवडी ।
मनोरथ कोडी पुरती तेथें ॥४॥