अवघा तो शकुन
अवघा तो शकुन ।
हृदयीं देवाचे चिंतन ॥१॥
येथें नसतां वियोग ।
लाभा उणें काय मग ॥२॥
छंद हरिच्या नामाचा ।
शुचिर्भूत सदा वाचा ॥३॥
तुका ह्मणे हरिच्या दासां ।
शुभकाळ अवघ्या दिशा ॥४॥
हृदयीं देवाचे चिंतन ॥१॥
येथें नसतां वियोग ।
लाभा उणें काय मग ॥२॥
छंद हरिच्या नामाचा ।
शुचिर्भूत सदा वाचा ॥३॥
तुका ह्मणे हरिच्या दासां ।
शुभकाळ अवघ्या दिशा ॥४॥