Get it on Google Play
Download on the App Store

योगी पावन मनाचा

योगी पावन मनाचा ।
साही अपराध जनाचा ॥१॥

विश्व रागे झाले वन्ही ।
संते सुखे व्हावे पाणी ॥२॥

शब्द शस्‍त्रे झाले क्लेश ।
संती मानावा उपदेश ॥३॥

विश्वपट ब्रह्म, दोरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥

संत मुक्ताई

स्तोत्रे
Chapters
मुंगी उडाली आकाशीं योगी पावन मनाचा