काही तथ्ये
...की पंडित भीमसेन जोशी हे त्यांच्या सततच्या विमानप्रवासामुळे भारताचे उडते गायक म्हणून ओळखले जात.
...की बजरंगबली हे हनुमानाचे नाव वज्रांगबली (वज्राचे बल अंगी असलेला) या शब्दाचा अपभ्रंश आहे.
...की भारत 'इ.स. २००८' या सालापर्यंत चांद्रयान या मोहिमेअंतर्गत चांद्रयान १ हे यान चंद्राकडे पाठविणार आहे. हे यान चंद्राभोवती ६२ मैल अंतरावर फिरत राहील.
...की अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका) या देशात विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कृष्णवर्णियांना समानतेचे पूर्ण अधिकार नव्हते.
...की दक्षिणपथ आणि देवभूमी ही महाराष्ट्राची पूर्वीची नावे होत.
.. की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर असे प्रख्यात आचार्य प्रह्लाद केशव अत्रे यांनी प्रथम संबोधले.
... की अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी त्यांना देऊ केलेले इस्रायल या तत्कालीन नवनिर्मित देशाचे अध्यक्षपद नाकारले होते (अल्बर्ट आईन्स्टाईन हे एक ज्यू धर्मीय होते आणि इस्रायलची स्थापना जगभर विस्थापित ज्यू धर्मीनी एकत्र येऊन केलेली होती).
...की संयुक्त संस्थाने या देशाच्या संसदेने इ.स. १९६६ साली भारतातील पूरग्रस्तांना मदत म्हणून साठ कोटी सिगारेट मंजूर केल्या होत्या.
...की ज्ञात इतिहासानुसार भारतातील पहिली मानवी वस्ती ११००० वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील बिंबटेकच्या परिसरात झाली.
...की सोलॅरीस ही जगप्रसिद्ध संगणक कार्यप्रणाली आता मुक्त स्रोतांतर्गत आणण्यात आली आहे