Get it on Google Play
Download on the App Store

व्यक्तिचित्र

नारायण गोपाळ धारप (ऑगस्ट २७, इ.स. १९२५ - ऑगस्ट १८, इ.स. २००८; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील लेखक, नाटककार होते. प्रामुख्याने भयकथा, गूढकथांकरता यांची ख्याती आहे. यांनी निर्मिलेले "समर्थ" हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा विशेष गाजल्या.

धारपांचा जन्म ऑगस्ट २७, इ.स. १९२५ रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बी.एस्सी.टेक पदवी मिळवली. धारप नोकरीनिमित्त काही काळ आफ्रिकेत वास्तव्यास होते. नंतर ते भारतांत आले आणि त्यांनी अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. 

अघटित हे त्यांचे सर्वांत पहिले पुस्तक प्रकाशित झाले आणि ते बऱ्यापैकी वाचकांच्या पसंतीस उतरले. हयामुळे हुरूप येऊन त्यांनी "अत्रारचा फास", "अंधारयात्रा" अशी आणखीन दोन पुस्तके प्रकाशित केली जी अतिशय तुफान लोकप्रिय झाली. पण त्यांचे नाव मराठी मनात बसले ते त्यांच्या अनोळखी दिशा ह्या कथासंग्रहामुळे. त्या काळी ह्या पुस्तकांच्या हजारो प्रति खपल्या आणि प्रत्येक रेल्वे बस स्टेशनवर ह्या प्रति विकल्या जायच्या. 

नारायण धारप ह्यांचाय्वर मराठी वाचकांचे प्रेम अश्या साठी जमले कि त्याच्या कथा वेगळी धाटणीच्या होत्या. ह्याबद्दल आम्ही पुढील चॅप्टर मध्ये बोलू. 

अखेरच्या काळात धारपांना फुफ्फुसांचा आजार जडला होता. त्यात न्यूमोनिया झाल्यामुळे १८ ऑगस्ट २००८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले