प्रकरण ६
त्या गुहेतील तो साधु अधिकच विचलित दिसत होता. "काय झाल स्वामी, तुम्ही आजकाल खुप अस्वस्थ दिसता आहात." त्याच्या शिष्याने विचारल. त्यावर तो साधु म्हणाला,"मुकुंदा, ज्याची भीती होती तेच झाल. तो बंद दरवाजा उघडला गेलाय. ती पुन्हा स्वतंत्र झाली आहे. इतिहासातील त्या घटना पुन्हा घडणार आहेत."
मुकुंदाः काय, पण स्वामी कस शक्य आहे. आपण तो दरवाजा शक्तीशाली मंत्रांच्या प्रभावाने बंद केला होता. ती तो दरवाजा उघडू शकत नाही.
स्वामीः तिने नाही उघडला. पण कोणीतरी नकळत तिला स्वतंत्र केल आहे. आणी अस करून भयंकर संकटाला आमंत्रण दिलय. मुकुंदा, आपल्याला तिला थांबवायला हव. नाहीतर विनाश अटळ आहे.
**************
सकाळचे १० वाजून गेले होते. अमेय ऑफिसला निघून गेला होता. रामूकाका आणी शारदा दुपारच्या जेवणाची करत होते. किमया हॉल मध्ये खेळत होती. अचानक तिच्या कानांवर एक आवाज पडला. तो आवाज तिच नाव घेऊन बोलावत होता. तिने प्रथम इकडे-तिकडे पाहील पण तिला कोणीच दिसल नाही. ती पुन्हा खेळण्यात लागली. परत एकदा त्या आवाजाने तिला बोलावल. किमयाने आता वरती बघितल तो आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. ती वरच्या मजल्यावर आवाजाच्या दिशेने जायला लागली.
काही वेळाने शारदा हॉल मध्ये आली तेव्हा तिथे किमया तिला दिसली नाही. तीने बाहेर शोधले तिथेही नव्हती. शारदाने रामूकाकांना सांगितले. दोघांचीही शोधाशोध सुरू झाली. पण किमया काही केल्या सापडत नव्हती. "बाईसाहेब, तुम्ही वरच्या मजल्यावर बघा. मी बंगल्याच्या आजुबाजूला शोधतो." रामूकाका बोलले. शारदा दुसर्या मजल्यावर गेली तिथे तिने तिनही बेडरूम्स शोधले. पण तिथेही किमया नव्हती. ती पुन्हा खाली जायला निघाली अचानक तिच लक्ष तिसर्या मजल्याकडे गेल. शारदा तिसर्या मजल्यावर गेली. तिथला खोलीचा दरवाजा उघडाच होता. शारदा घाबरत त्या खोलीत आली. त्या खोलीत थोडा अंधार होता. पण त्या अंधारात सुध्दा तिला किमया दिसली. ती कोपर्यात गुडघे दुमडून त्यात डोक खुपसुन बसली होती. शारदा तिच्या जवळ आली. आणी तिला हाक मारली. किमयाने डोक वरती केल. शारदा घाबरून मागे सरकली. किमयाचे डोळे लाल होते. तिचा चेहरा विचित्रच दिसत होता. तिचा श्वास जोरजोरात चालु होता. शारदाने घाबरत विचारल,"काय झालय किमया बेटा तु अशी का दिसतेस." तशी किमया उठून उभी राहीली. आणी घोगर्या आवाजात बोलु लागली,"मी किमया नाही. मी ह्या बंगल्याची मालकिण आहे. आणी आता हि पोरगी पण माझी आहे. मी हिला सोडणार नाही. मला माझ अर्धवट काम पूर्ण करायचय. निघून जा ह्या बंगल्यातून नाहीतर तुम्ही सगळे मराल." अस म्हणून ती घोगर्या आवाजात हसली. आणी अचानक ती बेशुध्द पडली. शारदा जवळ आली. तिने किमयाच्या अंगाला हात लावला. किमयाला सणकून ताप भरला होता. शारदाने तिला उचलल आणी त्या खोलीतून बाहेर निघून गेली. ती हॉल मध्ये आली. रामूकाका तिथे उभे होते. "बाईसाहेब, छोट्या बाईसाहेबांना काय झाल." रामूकाकांनी शारदाला आल्या आल्या विचारल. शारदाने किमयाला सोफ्यावर झोपवल आणी वरील हकिकत त्यांना सांगितली. "अरे देवा, बाईसाहेब, तरी मी तुम्हाला सांगितल होत कि बंद दरवाजा उघडू नका म्हणून. आता बघा काय होतय ते." रामूकाका डोक्याला हात मारून घेत म्हणाले.
शारदाः रामूकाका, काय झाल होत किमयाला. अशी का करत होती ती.
रामूकाकाः मला फक्त एवढ माहीती आहे. की इथे ह्या बंगल्याच्या मालकिणीच्या आत्म्याचा वास आहे. बंद दरवाजा उघडल्याने तो आत्मा स्वतंत्र झाला आहे तोच हे सगळ करतोय. आता यातून आपल्याला फक्त देवच वाचवू शकतो.
पूर्ण दिवसभर शारदा त्या भीतीखाली राहीली. संध्याकाळी अमेय घरी आल्यानंतर शारदाने त्याला सांगण्याचे टाळले. तिला माहीत होत की त्याने स्वभावाप्रमाणे याच्यातही काही वैज्ञानिक कारण शोधल असत. अमेय यापासुन अनभिज्ञ होता की त्याच्या आयुष्यातील एका भयंकर युध्दाला प्रारंभ झाला होता.
क्रमशः