जग ताराया अवतरलासी भक्त प...
जग ताराया अवतरलासी भक्त पूजिती सद्भावे।
कनवाळु तूं मुषकवाहन भक्तसंकटी तूं पावें ॥
बहु प्रेमानें ओवाळिन तुज मन वांछी तव गुण गावे।
विघ्नहराया येई झडकरी ऋद्धिसिद्धिसह तू धावे॥१॥
वक्रतुंड गुणवंत विघ्नहर गौरिनंदन गणपति जो।
आरति ओवाळीन मी त्यासी विघ्नांतक जगतारक जो॥धृ.॥
शुंडा शोभे सिंदुरचर्चित मस्तकी मुकुट झळाळी ।
मुक्ताहार हे कंठी रुळती कस्तुरितिलक हा तव भाळी ॥
मोरेश्वर सुत वासुदेव तुज प्रार्थी दीना प्रतिपाळी ॥
भक्तजनातें मंगलमूर्ती रक्षीं अतिसंकटकाळीं ॥ २ ॥ वक्रतुंड गुणवंत ॥