मनवाणीचा प्रवेश त्वद्रुपी...
मनवाणीचा प्रवेश त्वद्रुपीं नाहीं ।
फणिवर श्रुति बोले ना ज्यापरतें कांही ॥
सच्चिततत्व पद हें रतिघटना नाही ।
अत्यानंदातितसुख चिद्गगनीं पाहीं ॥ १ ॥
जय देव जय देव जय सद्गुरुनाथा ।
स्तुती करतां शिणल्या तव निगमागणनाथा ॥ धृ. ॥
हिमकर बहुता पापह वरि तुलना नाहीं
दिनकर कुलवर कोटी तेजासम नाहीं ॥
जगदाभासाबोधें मोहूनि लवलाही ।
शून्यांती तन्मयमन मुनि ध्याती कांही ॥ २ ॥
लवपल जनमन जडलें जरि कां तव नामीं ।
अत्याद्भुत करणी शुचि होतो बहुकामीं ॥
कळते शुद्ध निरंजन निर्मळ जो तो मी ।
मुळमायातित होउनि राहें निजधामी ॥ ३ ॥
तो महिमा पाहते पण टाकुनि निजनयनी ।
पाहुनि तन्मयराहे सच्चिद्धनगगनी ॥
अद्वय ब्रह्मानंदामृत प्राशन करूनी ।
नारायण वंदन करि सद्गुरुच्या चरणीं ॥ ४ ॥