आरती यतीची - जयजय वो यतिवर्या सच्चित् ...
जयजय वो यतिवर्या सच्चित् सुखघन विलासिया हो ।
सद्भावें ओवाळू अरती अखंड अविनाशिया हो ॥धृ॥
आदीमध्यें अंतीं अवघा आत्मा निर्विकार हो ।
भवसंसारापासुनि व्हावा विश्वाचा उद्धार हो ॥
म्हणवुनि धारण केली नरतनु माया विश्वाकार हो ॥१॥
वर्णाश्रम धर्मातें संपादुनिया यथान्वये हो ।
वेदोदित मार्गानें करुनि साधन चतुष्टय हो ।
प्रणवाच्या उच्चारें जाले चित्स्वरूपिं तन्मय हो ॥२॥
ब्राह्मणयोनी ठायीं सुंदर अधिकारि पाहुन हो ।
नासुनि अज्ञानासी नेत्रीं घालुनि ज्ञानांजन हो ।
महावाक्यविचारें त्यातें केलें निरंजन हो ॥३॥