श्रीआनंद - स्फुट पदे
पद.
राम राम म्हणतां सुख वाटे । जन्म मरण दु:ख तेणें सहजची तुटे । राम राम० ॥धृ०॥
देहबुद्धी सोडुनी रघुराज स्मरे । काल मृत्यू त्याचे पायीं विरे ॥१॥
राघवी भक्ती हेचि परमा युक्ती । शिवादिक योगी ज्यासी ध्याती ॥२॥
श्रीराम जयराम हेंचि निज नाम । आनंदमूर्ति मागेनिज प्रेम ॥३॥
अभंग.
देहाची म्या खोती अवनीवरी केली । लेखणी खोविली स्वानंदाची ॥१॥
स्वानंदाच्या पंथीं जाहलों मी पातकी । वाणी एकाएकीं संत आले ॥२॥
संतांपाशीं वस्तु घ्यावयासी जातां सोहं केण आतां सांपडलें ॥३॥
सांपडलें संत - लक्षणाचें बीज । तेणेंवाटे चोज दृश्यत्वाचें ॥४॥
द्दश्यत्व पाहतां द्रष्टा मीच झालों । लुटूं जो लागलों सोहंकेण ॥५॥
सोहंकेण मनीं आनंद लुटोनि । राहिलों लपोनी समाधिस्थ ॥६॥
समाधिस्थ असे देहींच असतां । तणें गुरुनाथा कळलेंसे ॥७॥
कळलेंसे त्यास धणी माझा पूर्ण । तेणें पै आकर्ण पाठवीला ॥८॥
पाठविला हेर नेलें निजपदा । जीवासी आपदा केली नाहीं ॥९॥
चुकविला मार इच्छेचे आवडी । खोतीची सांकडी फेडियेली ॥१०॥
फेडिली सांकडी आनंदमूर्तीची । कास सद्गुरुची धरियेली ॥११॥
पद.
गुरुरायाचें नाम सार सेवीरें । चित्त गुरुपदांबुजीं ठेवी रे ॥धृ॥
मग काळाचें भय तुज नाहीं रे । गुरुकृपें तरसील पाहीं रे ॥१॥
गुरु सच्चिदानंद आनंद - मूर्ती रे । नको विसरूं तयांची चरण - कीर्ती रे ॥२॥