Get it on Google Play
Download on the App Store

स्नान

विधी: गणेशाला प्रथमत: पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. याला स्नानीय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात.>

महत्त्वाचे: गणेशाची मूर्ती मातीची असल्यास एका पूजेच्या सुपारीत गणेश आहे आहे, असे मानावे. व त्याला स्नान घालावे. मूर्तीवर फक्त हलक्या हाताने पाणी शिंपडावे. सुपारीला ताम्हनात ठेवून खालील क्रिया करा. मंत्र-स्नानीय समर्पण (शुद्ध पाण्याने स्नान): 'हे देवा! गंगाजल जे सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ आहे. त्याने आपल्याला स्नान घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा'.

पंचामृत स्नान:
'हे प्रभू! दूध, दही, तूप, मध आणि साखरयुक्त पंचामृताने आपल्याला स्नान घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करा.' शुद्धोदक स्नान (पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान): 'हे प्रभू! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी उपस्थित आहेत. आपण स्नानासाठी हे जलग्रहण करा.' ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा. (स्नानानंतर शुद्ध वस्त्राने सुपारी किंवा गणेश मूर्तीला पुसून पुन्हा पाटावर ठेवा.)