प्रवेश पंधरावा 1
प्रवेश पंधरावा
(पांडवा बसला आहे.)
पांडबा - नानांना उतार पडला. देवानं दया केली. खरा गरिबांचा कनवाळू तूंच ! (राघू कपडे धुवून येतो. )
राघू - बाबा बघा; कपडे छान निघाले ते. खादीचे कपडे असे लख्ख निघतात.
पांडबा - राघू, साबण रे कुठचा पोरा ?
राघू - ते विद्यार्थी आम्हांला देतात; म्हणतात, आम्ही तुम्हांला आठवडयास एक वडी देत जाऊं; पण तुम्ही सूत मात्र नियमित कातलं पाहिजे. बाबा, आतां आपण बामणाबाणी नाहीं दिसणार का हो ? मी कपडे वाळले कीं ते घालीन अन् नानांच्या घरीं जाऊन येईन.
पांडबा - मी पण येणार आहें. पण मी लोकडांची मोळी आणून ती विकल्यावर येईन. आज तुलाच रांधलं पाहिजे. ती गेली आहे कामावर.
राघू - मी भाकर करीन व ती झांकून ठेवून जाईन. (जातो.)
पांडबा - चला, आपण बी कु-हाड घेऊन जावं .(जातो.)