Get it on Google Play
Download on the App Store

अंत

लोवक्राफ्ट काही प्रमाणात अतिशय वंशभेदी होता. त्याचे लगान सोनिया बरोबर झाले आणि तो न्यू यॉर्क मध्ये गेला. न्यू यॉर्क त्याला अतिशय आवडले तरी तेथील सर्व प्रकारच्या वंशाचे लोक राहत होते हे त्याला अजिबात आवडत नसे. तो जमेल ते काम करून उदरनिर्वाह करत असे आणि सोनियाच्या हातचे खाऊन तो चांगला लठ्ठ सुद्धा झाला. 

त्याचे ४ मित्र बनले ज्यांनी मिळून कलम क्लब नावाचा एक वाचन क्लब सुरु केला. त्यांनी खूप वाचन आणि लेखन केले तरी अजूनही लवक्राफ्ट एक लेखक म्हणून विशेष प्रसिद्ध झाला नव्हता. त्या काळांत भयकथाच लोक जास्त वाचत नसत आणि श्रीमंत लोक तर अजिबात वाचत नसत. वाचल्या तरी ड्रॅक्युला सारख्या कथा लोक वाचत असत. 

वियार्ड टेल्स ह्या मासिकांत त्याच्या कथा छापल्या जात. शेवटी सोनिया ची तब्येत बिघडली आणि तिचा धंदा सुद्धा बुडाला. लोवक्राफ्टचे काम सुद्धा मंदावले आणि त्यांचं आर्थिक स्थिती खालावली.  वियार्ड टेल्स ह्या मासिकाने लोवक्राफ्ट ला संपादक म्हणून नोकरी देऊ केली पण लोवक्राफ्ट ने निव्वळ आळशी पणा मुले ती नाकारली. त्याच्या मते उतारवयात दुसऱ्या शहरांत जाणे त्याला शक्य नव्हते (त्यावेळी लोवक्राफ्ट ३४ वर्षांचा होता ). शेवटी मासिकाने ती नोकर राईट नावाच्या अश्या माणसाला दिली ज्यावर लोवक्राफ्ट ने प्रचंड सडकून टीका केली होती. त्याने लोवक्राफ्टच्या कथा मासिकात प्रकाशित करणे कमी केले. ह्यामुळे लोवक्राफ्टचे उत्पन्न आणखीन खाली गेले. 

सोनिया सुद्धा त्याला वैतागून शेवटी सोडून शेवटी कॅलिफोर्निआ मध्ये गेली. न्यू यॉर्क चा खर्च झेपत नसल्याने लोवक्राफ्ट आपल्या मुलाच्या गावी म्हणजे प्रॉव्हिडन्स मध्ये परत आला. त्याचे घर मोठे असले तरी त्याला खायला प्यायला सुद्धा पैसे नव्हते. त्यामुळे त्याचे वजन झपाट्याने कमी होत गेले. त्याने काही पुस्तके लिहिली होती पण त्यांचा खप २०० प्रति पेक्षा कमी झाला. 

तो इतका वैतागला कि आपले शेवटचे पुस्तक त्याने प्रकाशनासाठी पाठवले सुद्धा नाही. १९३७ मध्ये डॉक्तरांनी त्याला आतड्यांचा कँसर आहे हे सांगितले. पैसे नसल्याने तो इलाज सुद्धा करू शकत नव्हता आणि ज्या वेळी तो डॉक्टर कडे गेला तेंव्हा तो शेवटच्या स्टेज ला होता. एका महिन्यात त्याचा मृत्यू झाला. मृत्यूच्या दिवसा प्रत्यंत त्याने आपल्या आजाराची अतिशय बारकाईने डायरी लिहिली.