Get it on Google Play
Download on the App Store

दगाफटका

पल्ला नदीच्या किनारी युसूफच्या प्रचंड मोठ्या सैन्याचा डेरा पडला होता. आदिलशाह संपूर्ण शक्तीनिशी मोहिमेवर निघाला आहे हि बातमी वार्यासारखी सगळीकडे पसरली होती. युसुफने ह्या वातावरणांत भयाची भर घालण्याचे काम मुद्दाम केले होते. वाटेवर सगळीकडे जिथे जिथे शक्य होते इथे त्याने मंदिरांचा विध्वंस, गायीची कत्तल आणि मराठी राजाला सहानभूती दाखविणार्या गावांच्या प्रमुखांना देहदंड दिला होता.

रत्नागिरी फक्त एक दिवसाच्या दौडीवर होती. सैन्य प्रचंड असले तरी इतकी मोठी मोहीम हल्लीच्या काळी आदिलशाहने  सैन्याला युद्धाचा जास्तच उत्साह होता. नदी पार केली कि पुढे रत्नागिरीत जावून दिलावर खानाच्या शोध घेणे मुख्य काम होते. भाडोत्री सैनिकांची तुकडी गोमंतकातून उत्तरेकडे येत आहे अशी बातमी सुद्धा होती त्यांना नेस्तनाबूत करणे किंवा आपल्या सैन्यात भाड्याला घेणे हे दोन पर्याय होते. भाडोत्री सैनिक कधीही खाल्या मिठाला जागत नाहीत त्यामुळे मोहिमेत त्यांना सहभागी करून घेण्यास युसुफ उत्सुक नव्हता.

तोरणा किल्ला हाती आल्याची बातमी आणि कोन्धाण्यावरून मराठी बंडखोर पळून गेल्याची बातमी युसुफला एकाच वेळी मिळाली. मराठी बंडखोर बहुतेक करून तक्षक सैन्याची मदत घेतील हा अंदाज युसुफला आला. तोरण्यावरून आईसाहेब पळून गेल्या हि बातमी सुद्धा युसुफला मिळाली. अब्दुल त्यांना शोधण्यास काहीही कसर ठेवणार नाही ह्याची कल्पना असून सुद्धा युसुफने त्याला पत्र पाठवले. आईसाहेब पळून गेल्या तरी एखाद्या महिलेला जिवंत जाळून अयीसाहेब शत्रूच्या हाती लागून मारल्या गेल्या हि बातमी पसरवायला युसुफने सांगितले. रागाच्या भारत बंडखोर काहीतरी चूक करतील किंवा मराठी सैन्याचा तेजोभंग होयील अशी अपेक्षा युसुफला होती.

सूर्योदय होताच सैन्याने नदी पार करायला सुरुवात केली. ओहोटी असल्याने एका भागातून नदी सहज ओलांडता येत होती. युसुफ स्वतः मात्र नावेतून नदी पार करत होता. हजारो सैनिक, हजारो घोडे आणि शेकडो हत्ती हळू हळू नदी पार करत होते. आपल्या नावेतून युसुफ सैन्याचे परीक्षण करत होता. संख्याबळ त्याच्या बाजूने होतेच पण सारे सैन्य प्रशिक्षित सुद्धा होते. आपल्या आयुष्यातील हि कदाचित शेवटचीच मोहीम असेल असे युसुफ ला मनात वाटले. दिवा जसा मोठा होवून मालावतो तश्याच प्रकारे आदिलशाही सुद्धा अस्त पावत आहे असे त्याला मनातून वाटत होते. युसुफला आपले युद्धअभ्यासाचे धडे आठवले, शत्रू बलवान असला तर युद्ध टाळण्यात हुशारी असते पण समजा शुत्राला सामोरे जाणायची वेळ आली तर शत्रू कितीही बलवान असला तरी त्याला उत्सुकुतेने सामोरे जायला पाहिजे. तलवार चालवायची नसेल तिला म्यानातून बाहेर सुद्धा काढता नये हा युसूफच्या शिक्षकाचा नियम होता. आज प्रचंड मोठे सैन्य जरी बरोबर असले तरी युद्धाला जायची ती उत्सुकता युसूफच्या मनात नव्हती. कदाचित आपले वय झाले असेल असे युसुफला वाटले. तो जेंव्हा २० वर्षांचा होता तेव्हा बहुतेक वेळ घोड्यावरच घालवायचा. शिकार आणि लढाई ह्यातंच त्याचे यौवन गेले होते. आता कदाचित रक्तात ती गरमी नसेल, ह्या मोहिमे नंतर युद्धातून निवृत्ती घ्यावी असा सुद्धा विचार त्याच्या मनात आला.

"हुजूर एक खबर आहे." युसूफचा अंगरक्षक नावेच्या मजल्यावर आला.

"नावेवर खबर कशी काय आली सय्यद ?" युसुफने आश्चर्याने विचारले. सय्यदने दूरवर बोट दाखवले. एक सैनिक पोहून पत्र घेवून आला होता.

युसुफने पत्र हाती घेतले. तांब्याच्या डबित कपड्यावर लिहिलेले पत्र अजिबात भिजले नव्हते. युसुफने खिश्यातून एक मुद्रा काढून सैनिकाकडे फेकली.

पत्र वाचता वाचता युसूफची मुद्रा अत्यंत गंभीर झाली, त्याच्या चेहराय्वारचे भाव इतके बदलले कि सय्यद सुद्धा चिंतीत झाला. "हुजूर काही चिंतेचे कारण आहे का ?" सय्यद ने विचारले पण युसुफ काही बोलला नाही. "तो सैनिक कुठे आहे?" युसुफने विचारले.  सय्यदने इशारा केला आणि युसूफच्या सैनिकांनी पत्र घेवून आलेल्या सैनिकाला युसुफ पुढे हाजीर केले. युसुफने सय्य्दच्या कानात काहि तरी कुजबूज केली आणि सय्यदने मान हलवली.

सैयदने आपल्या कमरेची कट्यार काढली आणि संदेश घेवून आलेल्या सैनिकाच्या हृदयात घुसवली. अस्फुट असा आवाज त्याच्या तोंडातून बाहेर आला पण दुसऱ्या सैनिकाने तो आवाज बाहेर पडू दिला नाही. सैनिकांनी त्याचे शव नदीत फेकून दिले.

युसुफचे मन उद्विग्न झाले होते पण बोलून दाखविण्या साठी अब्दुल इथे नव्हता. नदी च्या पैलीतीरी पोचताच त्याला लवकर सार्या स्थितीचा ताबा घ्यायचा होता.

काही मिनिटांत युसूफची नाव पैलतीरावर पोचली. सैयद युसुफचा खास अंगरक्षक होता. इतके प्रचंड सैन्य घेवून जाताना कधी कधी आतूनच दगाबाजी व्हायचा धोका असतो, त्यांत मुसलमान सैनिक मध्ये अनेक कारणाने दुही आधीच असते. त्यासाठी एक चांगला सेनापती आपल्याच सैन्यांत अनेक गुप्तहेर ठेवतो. कुठला सरदार काय बोलत आहे, कुणाच्या मनात दगा आहे ह्याची सारी वित्तंबातमी सेनापतीला असायला पाहिजे. युसुफने आपले हेर आधीच पेरून ठेवले होते. आता त्यांना वापरायची वेळ आली होती.

पैलतीरी पोचतांच युसुफने सार्या सरदाराना डेरा न टाकता पुढे चालायचा हुकुम केला.  फक्त आपल्या घोडेस्वारांना मागे ठेवले. तक्षकसेनेला गाठून त्यांचा पूर्ण बिमोड करण्याची जबाबदारी युसुफने सरदार आफताबखानवर सोपवली. आफताब खान अनुभवी योद्धे होते, घोडदळ आणि पायदळाला बरोबर घेवून युद्धे करण्याचा त्यांचा अनुभव जबर दस्त होता. युसुफ च्या निर्णयाने सार्या सैन्यात जोश पसरला इतके दिवस पायपीट करून शेवटी त्यांना रक्त सांडण्याची संधी भेटत होती. सारे सरदार युद्धाच्या तयारीत असताना युसुने ६० घोडेस्वारांची एक तुकडी मात्र मागे पाठविली.

"संपूर्ण जंगल फिरा, बिजापूर मधून कोणीही संदेश घेवून आला तर त्याला वाटेत पाकादुंत तत्काळ मारा. संदेश इथवर घेवून या. कुणालाही ह्या आदेशाचा पत्ता लागता कामा नये हे बघा. त्याच प्रमाणे माझी मुद्रा असलेला संदेश सोडून कुठलाही संदेश इथून बाहेर जाता कामा नये. इथे कसूर म्हणजे माझा जीव जायील हे लक्षांत ठेवा." युसुफ च्या आदेश चमत्कारिक होता तरी त्याचे सैनिक मात्र १००% विश्वासू होते. ६० स्वरांची तुकडी तत्काळ मागे फिरली.

सकळी उजाडले तसे सैन्याने छावणी टाकली. तक्षक सैन्य अवघे २० कोस  अंतरावर आहे आणि मराठी सैन्य २०० कोसावर आहे अशी बातमी टेहाळणी स्वारांनी आणली होती. आफताब खान काही तास विश्रांती घेवून तक्षक सैन्यावर चाल करणार होता. युसुफ आपल्या ५ हजार स्वरानिशी नंतर माघाहून येणार होता.

युसुफने सूर्योदयाच्या किरणात पुन्हा ते पत्र बाहेर काढले.

आदिलशाहीचा पेटी अधिकारी सलामतबक्ष ह्यांच्या हस्ताक्षरांत लिहिलेले ते पत्र होते.

"युसुफ मागे फिरा, शहाचा आदेश आहे." खाली मात्र शहाची सही नव्हती उलट शहजाद्यांची सही होती. शहाची मुद्रा सुद्धा होती. खाली शाहचे विश्वासू वजीर ह्यांनी तपशील लिहिला होता. शहाला कैदेत ताकेले गेले होते, शाहजाद्यानी स्वतःला नवीन शाह घोषित केले होते, चिस्ती फाकीराना भर चौकांत हाल हाल करून मारले गेले होते. युसुफ परत नाही आला तर त्याला सुद्धा तीच शिक्षा होणार होती.

युसुफला दगाबाजी चा अनुभव होता. दरबारांत असल्या प्रकारची दगाबाजी नेहमीच होत असते. शाहने चिस्ती फाकीरावर भरवसा टाकून आपल्या वजीर मंडळींचा दोष कदाचित ओढवून घेतला होता. आता शाह जिवंत सुद्धा असेल ह्याची खात्री नव्हती. परत फिरलो तर युवराज कदाचित युसुफला सुद्धा सोडणार नव्हता. अश्या परिस्थितीत मागे फिरणे म्हणजे मूर्खपणा होता. शहाचे सारे दूत मारले गेले तर मात्र शहाच्या नवीन हुकुमाचा पत्ता आणि शहजद्यच्या दगाबाजीचा पत्ता सैनिकांत कुणालाही लागला नसता. एकदा मराठी सैन्याचा बिमोड झाला कि युसुफ सरळ आपल्या घरी परतणार होता. आपल्या वाटेला यायची हिम्मत शहजाद्याला नव्हती हे सुद्धा युसुफला ठावूक होते.

आपल्या बायका मुलांचे रक्षण जरुरी होते म्हणून युसुफने अब्दुल ला पत्र पाठवून माघारी जायला सांगितले. पत्र त्याने मुददाम क्लिष्ट भाषेंत लिहिले. अब्दुल जे समजायचे असेल ते तो समजेल ह्याची खात्री युसुफला होती.

या पुढील पावले त्याला विचार पूर्वक टाकायची होती. तक्षकसेनेला नेस्तनाबूत करणे मुश्किल नव्हते कारण युसुफजवळ संख्याबळ होते. ते काम पार पडले कि सर्व सैन्याला घेवून मराठी सैन्याला भिडायचे होते. मराठी सैन्याची ताकत आणखीन कमी होती. एकदा कि मराठी राजा मारला गेला कि कोंढाणा युद्ध न करता शरणागती पत्करेल. युसुफ चे घोडदळ त्या नंतर प्रचंड वेगाने आपल्या मुलुखांत जावून बसेल. शहजाद्याला जर अक्कल असेल तर तो युसुफ बरोबर हिताचेच संबंध ठेवील ह्या दोन युद्धां नंतर इतर सरदार मंडळीत पुन्हा विनाकारण युद्ध करण्याची हौस सुद्धा नसेल. त्या नंतर कदाचित राजकीय मार्गाने शहाला कैदेतून बाहेर काढण्याचा पर्यंत केला जावू शकतो.

पण सध्या माघार घेतली तर मराठी राजाला आणखीन बाल प्राप्त होयील आणि पुन्हा इतकी मोठी मोहीम हाती घ्यायची टाकत आदिलशाही मध्ये नव्हती.

काफिर भाषेंत तक्षक हे सापाचे नाव आहे हे युसुफला माहित होते. आधी जे भास झाले होते त्यांत सुद्धा साप होता. पण हा साप आता त्याच्या सैन्या पुढे ठेचला जाणार होता.