Get it on Google Play
Download on the App Store

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस  नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत  असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे. त्यात जॉनची आजीसुद्धा होती. जॉनचे आई-वडील पाच वर्षांपूर्वी म्हणजे जॉन १ वर्षाचा असताना एका अपघातात मारले गेले होते. तो त्याच्या आजीजवळ राहायचा. गावात जे लोक देवाकडे जायचे त्यांचे नातेवाईक सिमेट्रीमध्ये जाऊन त्यांना फुले वाहायचे, त्यांच्या थोम्बजवळ मेणबत्ती लावायचे. पण जॉन त्याच्या आई-वडिलांच्या थोम्बजवळ मेणबत्ती लावायला कधीच गेला नव्हता. तो नेहेमी आजीला विचारायचा, तेंव्हा आजी सांगायची कि त्यांना अनिस घेऊन गेला. थेट त्याच्याकडे. जॉनला आपल्या आई-वडिलांचा अभिमान वाटायचा. इतका मोठा संत त्यांना घेऊन गेला. हि गोष्ट मित्रांना सांगताच ते त्याला हसायचे आणि जॉनला सैतानाच्या पुजाऱ्याचा मुलगा म्हणून हिणवायचे. मग जॉन हिसमुसला होऊन घरी यायचा.  मग आजी त्याला त्याचं आवडतं चॉकोलेट द्यायची. रोज झोपताना आजी त्याला गोष्टी सांगायची. त्यातली हॅलोविनची गोष्ट त्याला फार आवडायची.आजही त्यानी तीच सांगायचा हट्ट धरला. मग आजी म्हणाली,    

" बरं का जॉन ! फार फार पूर्वी फेरी नावाचं एक छोटंसं टुमदार खेडं होतं. खूप खूप सुंदर अगदी फेरिलँड  सारखं.  तिथले लोक असं मानायचे कि पूर्वी तिकडे पऱ्या दिसायच्या. ते त्यांचं राज्य होतं. मग हळू हळू तिकडे माणसे यायला लागली आणि पऱ्या  तिथे यायचे बंद झाले. पण अजूनही गावाच्या बाहेरचा डोंगर आहे ना तिकडे पऱ्या दिसल्या असे अनेक लोक सांगत. जास्त करून त्या दिसायच्या हॅलोवीनच्या दिवशी. हॅलोविन आपण का साजरा करतो माहित आहे ना ? जे लोक मृत झले आहेत. त्यांची आठवण म्हणून. ३१ ऑक्टोबरला आपण हॅलोविन साजरा करतो. त्या दिवशी सगळे जण भुताचे कपडे घालतात. एकमेकांना चोकोलेट्स, मिठाई देतात. त्या गावात एक टायलर नावाचा तरुण होता. उमदा,देखणा तो सुतारकाम करत असे. त्या कामात तो एकदम तरबेज होता. मग त्यावर्षीचा हॅलोविन जवळ येत होता. यावेळी टायलरने स्वतःसाठी लाकडापासून मास्क बनवायचे ठरवले. तो असं असेल कि गावात कोणाकडे नसेल आणि इतका भयानक असेल कि सगळेच घाबरून जातील.   गावाच्या टोकाला असलेल्या पऱ्यांच्या डोंगरावर चांगली झाडे आहेत. तिथल्यासारखी लाकडे गावात कुठे मिळत नाहीत. त्याचा वापर जर आपल्या सुतार कामात केला तर खूप फायदा होईल असे त्याला गावात अनेकांनी सांगितले होते. तो याविषयी त्याच्या आईशी बोलायचा पण ती त्याला कधीच तिकडे पाठवायची नाही. तिकडे सैतान राहतो असे तिचे म्हणणे होते. मग तिला न सांगताच तो एका संध्याकाळी तो त्या डोंगराकडे निघाला.  डोंगर चढताना त्याला जाणवले कि किती सुंदर जागा आहे ! लोक उगाच इकडे यायला घाबरतात. तो जसजसा वर चढत गेला तसतसे दृश्य अजून सुंदर होत गेले. मग तो जाऊन त्याच्या मास्कसाठी योग्य असे लाकूड शोधू लागला. तो सुतार असल्यामुळे त्याला लाकडांची चांगली पारख होती. शोध घेताना त्याला समजले कि हा डोंगर म्हणजे पैशाची खाण आहे. इथे सगळी झाडे सुतार कामासाठी उत्तम आहेत.इतक्यात त्याला एक वाळलेली मोठी फांदी दिसली मग त्यानी ती कापून घरी घेऊन आला. मग रात्रभर जागून त्याने त्याचा  मास्क बनवला. बनवल्यावर त्यालाच आश्यर्य वाटले कि इतका भयानक मास्क आपण कसा बनवू शकलो. जणू हात त्याचे होते आणि दुसरे कोणीतरी त्यांच्याकडून मास्क बनवून घेत होते. हॅलोवीनच्या दिवशी सगळ्यांनी त्याचा मास्क बघून त्याचे कौतुक केले. खास करून मेरीने त्या दोघांचे लग्न ठरले होते.    त्याच रात्री गावात एक खून पडला. " आजी सांगत होती आणि जॉन झोपला. आजीला झोप येत नव्हती. तिला आठवत होते ते रॅमचे प्रेत छिन्न विछिन्न झालेले. रॅम म्हणजे टायलरचा म्हणजेच जॉनच्या वडिलांचा खूप जवळचा मित्र. आजी मुद्दामच नाव बदलून जॉनला स्टोरी सांगत होती. ती गोष्ट त्याच अनिस गावची होती. फेरी असं गावच नव्हतं. रॅमनीच टायलरला त्या डोंगरावर जायचा सल्ला दिला होता. मग असे रोज होऊ लागले रोज एक खून. जे मरायचे त्यांचे सगळे रक्त शोषून घेतलेले असायचे. गावात भीतीचे वातावरण पसरले. असे यापूर्वीही झाले आहे असे लोक कुजबुजू लागले.   इकडे मेरी आणि टायलरच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागली होती. गावात चाललेल्या खुनाच्या सत्रामुळे लग्न साधेपणीच झालं. मेरी लग्न होऊन टायलरच्या घरी आली. नव्या नवलाईचे दिवस संपले. एक दिवस मध्यरात्री अचानक मेरीला जग आली तर शेजारी टायलर नव्हता. तिनी घरात शाळेकडे शोधले पण तो दिसला नाही. ती वाट पाहून झोपली सकाळी जाग आली तेंव्हा टायलर बिछान्यात होता. थोड्या वेळाने गावात ओरड झाली कि एका २२ वर्षाच्या मुलीचा खून झाला आहे. मेरीने हे ऐकल्यावर तिला जरा विचित्र वाटले. तिला टायलरच्या रात्री गायब होण्याशी या खुनाचा संबंध आहे असे वाटू लागले. जॉन मात्र त्याच्या नेहेमीच्या कामात मश्गुल होता.त्याच्या वागण्याबोलण्यात  तिला काहीच फरक दिसला नाही.  तिने त्याच्यावर नीट लक्ष ठेवायचे ठरवले. पण तिला ते जमायचे नाही कारण ती आई होणार होती. लवकरच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिने त्याचंनाव जॉन ठेवलं   त्यानंतर बाळाच्या संगोपनात तिचा वेळ जाऊ लागला.  पुढच्याच महिन्यात जॉन वर्षाचा होणार होता. आता जॉन त्याच्या आजीजवळ झोपायचा. हॅलोविनला दोन दिवस उरले होते. जॉनचा पाहिलं हॅलोविन म्हणून मेरीने त्याला छोट्या चेटक्याचा ड्रेस शिवला होता. तो घालून जॉन किती गोड दिसेल या कल्पनेत ती खुश होती. त्याचं रात्री तिला अचानक जाग आली. जॉन हळूच दार उघडून बाहेर जात होता. तिने जॉनच्या आईला उठवून सांगितले. तो अनिसच्या प्रभावात आहे असे त्याची आई म्हणाली," नक्कीच त्याने त्या डोंगरावरून काहीतरी आणले असणार. म्हणून टायलर त्याच्या प्रभावासखाली आला. अनिस काही फुकट देत नाही.  तो सैतान स्वतःच्या कामासाठी त्याचा वापर करून घेतोय . माझ्या लक्षात आलंय ते. तो अनिस रक्तपिपासू चांडाळ आहे. स्वतःची रक्ताची तहान भागवण्यासाठी तो टायलरकडून माणसांना बोलावतो. मग त्यांचं रक्त पितो. हि साखळी शेकडो वर्ष मागे जाते. आधीही त्या टेकडीच्या मोहात पडून अनेक जण त्याला गावात घेऊन आले. या घटना हॅलोवीनच्या काळातच चालू होतात. मग त्याचं मन भरलं कि तो शांत होतो. मग काही वर्षांनी परत जागा होऊन लोकांचं रक्त पितो. पोरी या गावात जन्म गेलाय माझा. तू नको जाऊस पोरी या छोट्या जॉनचा तरी विचार कर." मेरी कळवळून म्हणाली," मॉम मला जावंच लागेल टायलरला त्याच्या कचाट्यातून सोडवावेच लागेल." असे बोलून मेरी निघून  गेली. टायलरची आई ओरडत रस्त्यावर आली लोकं गोळा झाले. तिनी सगळ्यांना मेरीला थांबवायला सांगितले, पण भीतीने कोणीच पुढे गेले नाही. उलट या सगळ्या खुनांना तोच जबादार आहे हे सगळ्यांना समजले त्यानंतर मेरी आणि टायलर कोणालाही दिसले नाही.   

दुसऱ्या दिवशी जॉन गावात फिरत होता. तो मुलांशी खेळायला गेला तेंव्हा त्यांनी त्याला सैतानाच्या पुजाऱ्याचा मुलगा म्हणून हिणवले. तसेच गावात जे काही खून होत आहेत ते त्याच्या वडिलांमुळे असेही बोलले. जॉन हिरमुसून चर्चच्या बाहेर एका झाडाखाली बसला. इतक्यात," व्हॉट हॅपन्ड माय चाईल्ड?" असा आवाज आला. त्यांनी वर वळून पाहताच एक खूप वयस्कर फादर त्याच्याकडे बघून हसत होते. जॉन गाल फुगवून म्हणाला," माझ्या डॅडनी असं काय केलं कि सगळे लोकं त्यांचा राग करतात?आणि तुम्ही कोण या गावात नावीत आहेत का? तुम्ही या चर्चचे फादर नाहीत . " फादर हसून म्हणाले," हो बाळा ! म्हणशील तर मी या गावात नवा आहे आणि म्हणशील तर जुना. बरं आता रुसू नकोस.  आता मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. तुझी आजी सांगते ना त्याबद्दल." "ती फेरी गावाची का ?" " हो तीच फक्त फेरी आणि अनिस या गावाची. आणि त्यातला तरुण टायलर म्हणजे तुझे डॅड."  "काय आजी सांगते ती माझ्या डॅड ची गोष्ट?" जॉन डोळे विस्फारून म्हणाला. " फादर सांगा ना इथे सिमेट्रीमध्ये सगळ्यांचे थोम्ब आहेत माझ्या मॉम ,डॅड चे का नाहीत?" फादर दुःखाने म्हणाले कि तुझे मॉम - डॅड कधी मिळालेच नाहीत." जॉन उत्साहाने म्हणाला," म्हणजे ते जिवंत असतील का ?" फादर मन हलवत म्हणाले," नाही. ते आता जिवंत नाहीत.     "आता मी तुला अनिसबद्दल सांगणार आहे. फार फार पूर्वी म्हणजे हा अनिस या गावात यायच्या आधी या गावाचं नाव खरंच फेरी होतं. हे गाव परीराज्याइतकच सुंदरही होतं. मग हा अनिस या गावात राहायला आला. तो डोंगर आहे ना ! त्यावर त्यानी चर्च बांधले. गावातले लोक देवभक्त होते. ते तिकडे जाऊ लागले. मग हळू हळू त्यांच्या लक्षात आले कि तो जीजस चा नाही तर सैतानाचा पुजारी आहे. तो देवाविरुद्ध होता. तो दिसायला अतिशय देखणा होता बऱ्याच लोकांवर त्याचा प्रभाव पडत असे. या गावात चर्च होते त्याचे फादरसुद्धा त्याचा व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले. मग त्यानी गावातल्या चर्चमध्ये त्याचा फोटो लावला. या अनिसनी आपल्या अनुयायांना घेऊन एक साधना आरंभली. ज्यामुळे डेव्हीलला या पृथ्वीवर आणायचे होते. मग संपूर्ण पृथ्वीवर त्याचेच राज्य झाले असते. इकडे गावातले देवभक्त लोक घाबरले त्यानी जीजसला साकडे घातले," देवा कोणाचेतरी रूप घेऊन  ये  आणि या सैतानाला थांबव."    मग त्या गावात फादर ऑगस्टाईन आले. ते त्या गावापासून खूप लांब राहत होते. त्यांच्या स्वप्नात जीजस आला आणि त्या गावात जाण्याविषयी मार्गदर्शन केले. काही दिवसांवर हॅलोविन आला होता. इकडे अंनिसची साधना जोरात चालू होती. तो गावातल्या लहान मुलांचे बळी सैतानाला चढवत होता. गावातले लोक जीव मुठीत घेऊन बसले होते. ते काहीच करू शकत नव्हते. हालोवीनच्या दिवशी डेव्हील या पृथ्वीवर येणार होता. हॅलोवीनच्या आधल्या दिवशी रात्री फादर ऑगस्टाईन निघाले, अंनिसचा बंदोबस्त करायला. त्यानी गावातल्या लोकांना मदतीसाठी बोलावले, कारण शुभ शक्तीची एकजूट त्या सैतानाला हरवणार होती. भीतीपोटी फादर बरोबर कोणीही गेले नाही.

मग फादर एकटेच निघाले. डोंगरावर एक चर्च होते. त्याचा रंग काळाकुट्ट होता. त्या जागेचे अदृश्य रक्षक फादरना अडवू शकले नाहीत. फादर दिसताच ते आपोआप दूर झाले.    फादर दार उघडून आत गेले. समोरच एका व्यासपीठावर डेव्हिलची भयानक मूर्ती होती. अनिस आणि त्याचे अनुयायी डोळे मिटून मंत्र पुटपुटत  होते. लवकरच हॅलोविन सुरु होणार होता. त्यांचा देव पृथ्वीवर अवतरणार होता. त्याला प्रसाद म्हणून एक कोवळा ५ वर्षांचा मुलगा बांधून ठेवला होता. फादर ऑगस्टाईननी त्या मुलाकडे पाहिलं त्यांच्या मनात अपार करुणा दाटून आली. मग त्यानी जिजसचं स्मरण केले आणि मंत्र बोलायला सुरवात केली. जिजसने स्वतः त्यांना याविषयी मार्गदर्शन केले होते. ते मंत्र बोलत बोलत डेव्हिलच्या मूर्तीजवळ निघाले. इतक्यात अनिस जागा झाला. वातावरणात झालेला बदल त्याच्या लक्षात आला. इतक्या वर्षांनी त्याला साधनेसाठी योग्य अशी जागा मिळाली होती. जी जागा पवित्र किंवा अपवित्र शक्ती बोलाविण्याची योग्य होती. स्वतः डेव्हिलने त्याला या ठिकाणी येण्यास सांगितले होते. आता त्याच्या स्वप्नपूर्तीचा क्षण होता. तो फादर ऑगस्टाईनवर चालून गेला. परंतु एक शुभ्र वलय त्यांचे रक्षण करत होते. अंनिसचे अनुयायी घबरून पळू लागले. त्या जागेच्या अदृश्य रक्षकांनी त्यांना हाल हाल करून मारून टाकले. ते ती जागा सोडून जाऊच शकत नव्हते. त्या संपूर्ण दालनात सर्वत्र रक्त आणि मासाचा सडा पडला होता. फादर ऑगस्टाईन डेव्हिलच्या मूर्तीसमोर गेले त्यानी जीजूसचे स्मरण केले आणि त्यावर रोझरीमधून होली वॉटर उडवले. ते पाणी एका अतिशय पवित्र जागेतले होते. त्याक्षणी मेणबत्ती उष्णतेने विरघळावी तशी डेव्हिलची मूर्ती विरघळली. हे सर्व पाहणारा अनिस खूप चिडला त्याची सर्व स्वप्न क्षणात भंगली होती. मग तो फादर ऑगस्टाईनना म्हणाला," तू माझी स्वप्न तोडलीस. उद्या हॅलोवीनच्या दिवशी मी सर्वशक्तिशाली अमर बनणार होतो. माझे प्रभू या पृथ्वीवर प्रकटणार होते. आता असे काही होणार नाही. ज्याप्रमाणे मी हि जागा सोडून जाऊ शकत नाही तसेच तुही इथे अडकून बसशील. दर पाच वर्षांनी हॅलोवीनपासून मी या गावातल्या लोकांचं रक्त पिईन.तू मला अडवू शकत नाहीस.” फादर ऑगस्टाईनना हे समजले कि आपण त्याचा पूर्ण नॅश करू शकत नाही. मग त्यानी आपल्याकडे असणाऱ्या सर्व शक्तीने त्या डोंगराला रिंगण घातले. ज्यातून अनिस बाहेर जाऊ शकणार नाही. मग ते चर्च कोसळू जमीनदोस्त झाले. फादरनी त्या छोट्या मुलाला गावात सुखरूप पाठवले. त्या मुलानी गावात जाऊन सगळ्यांना काय घडले ते सांगितले. तेंव्हापासून कोणालातरी भूल पडून अनिस त्या डोंगरावर बोलावतो आणि आपली रक्ताची तहान भागवतो.  असे काही बळी घेतल्यावर तो आपोआप शांत होतो पाच वर्षांसाठी." फादर नी त्यांची गोष्ट संपवली. जॉन डोळे विस्फारून ऐकत होता. मग तो म्हणाला ,"मग त्या फादर ऑगस्टाईन त्यांचं काय झालं?"" ते आहेत या गावाचं रक्षण करायला. पण कोणीतरी मूर्ख त्या डोंगराच्या प्रलोभनाला बळी पडतोच आणि अनिसचं फावतं. जसे तुझे वडील गेले." "यावर काहीच उपाय नाही का ?" जॉननी विचारले.

"आहे. गावातले सगळे लोक जर एकत्र आले तरच हे शक्य आहे. एकजूट हि खूप मोठी शक्ती आहे. पॉझिटिव्ह वाइब्स  त्यामुळे निर्माण होतील. सगळ्यांनी मिळून त्याचे शव शोधून ते अग्नीच्या स्वाधीन केले तरच तो कायमचा नष्ट होईल. त्याआधी तुझ्या वडिलांनी बनवलेला मास्क शोध. तो सुद्धा जाळून नष्ट करावा लागेल. सगळ्या लोकांशी बोलावं लागेल." मग जॉननी घरी जाऊन घडलेली गोष्ट आजीला सांगितली. तिच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली," माझ्या मुलाच्या एका चुकीमुळे गावातले अनेक निष्पाप जीव गेले. जर ती चूक सुधारायची संधी मिळत असेल तर मी आहे तुझ्याबरोबर." मग जॉन त्याच्या वडिलांच्या बंद असलेल्या वर्कशॉप मध्ये गेला आणि मास्क शोधायला लागला. त्याची आजीही त्याच्याबरोबर आली. टायलरच्या वस्तू पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. खूप शोधूनही तो मास्क सापडला नाही. जॉन दमला मग म्हणाला," आजी सांग ना डॅडची अशी कोणती खास जागा होती का जी त्याला खूप आवडायची ? जो त्याच्या काही महत्वाच्या वस्तू तिकडे ठेवायचा ?" आजी विचार करू लागली मग एकदम म्हणाली ," अरे हो माझ्या लक्षात कसं आलं नाही !" त्या वर्कशॉप मध्ये एक झाडाचं खोड होतं. वरून  दिसायला ते फक्त एका झाडाचं खोड होतं, पण टायलरनी ते कोरून तिजोरी बनवली होती. खूप प्रयत्न करून त्या दोघांनी ती तिजोरी उघडली. त्यात तो मास्क होता. तो पाहून दोघांच्याही अंगावर काटा आला. त्याच्यात भयानकता पुरेपूर भरली होती.  त्या गावातले सगळे लोक रात्री एकत्र जमून गप्पा मारायचे. मग जॉन त्याच्या आजीला घेऊन त्या ठिकाणी गेला नि त्यानी सगळ्या लोकांना त्या फादरनी सांगितलेली हकीगत सांगितली . जॉन म्हणाला," मी फक्त सहा वर्षांचा आहे. मला माहित आहे माझ्या डॅडनि चूक केली. ती सुधारायचा आपण प्रयत्न करूया. आपल्या गावावरून हे संकट कायमचं घालवूया." एका माणसांनी विचारले," अरे ! पण आम्हला काही होणार नाही याची काय शाश्वती ? ते फादर कुठे आहेत? " इतक्यात अंधारातून आवाज आला," मी इकडे आहे. जॉन सांगतोय ते खरे आहे." तिकडून फादर येत होते. ते वृद्ध आणि वयस्कर होते. ते म्हणाले,"असे किती वर्ष घाबरून राहायचे ? तुमची मुले - बाळे पुढच्या आयुष्यात आनंदाने राहावी असे तुम्हाला वाटत नाही का ? त्याचा प्रत्येक सण सुखाचा जावा, या गावाची जीवघेण्या संकटातून सुटका व्हावी असे तुम्हला वाटत नाही का ?" " मी जाणार ! मी बदला घेणार ! माझ्या मुलाचा त्या सैतानाने बळी घेतलाय, माझी पत्नी पण येणार." रॅम चे वडील म्हणाले. " हो आम्ही सुद्धा येणार. आमच्या मुलांसाठी . " अनेक आवाज आले. मग जॉनने तो मास्क आपल्या हातात घेतला आणि तिथल्या शेकोटीत टाकला. त्या मास्क मधून जोरात किंचाळल्याचा आवाज आला आणि त्याची राख झाली . गावातल्या लोकांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. मग सगळेच हातात हत्यारे घेऊन डोंगराच्या दिशेनी निघाले.

फादर त्यांचे नेतृत्व करत होते. छोट्या जॉननी फादरचा हात धरला होता. त्याची आजीही सोबत होती. ते जसजसे डोंगराजवळ येऊ लागले तसतसे त्यांना वेगवेगळे भास होऊ लागले. जसे त्यांचे जिवलग त्यांना मागून हाका मारताना ऐकू येऊ लागले. त्याना त्या रस्त्याच्या जागी तळे दिसू लागले. आपण बुडू या भीतीने लोक मागेच थांबले. अनेकांवर वन्य प्राणी चालून आले. लोक त्यामुळे भरकटू लागले. मग त्यातून एक आवाज आला," स्थिर राहा लोकहो ! मी आहे तुमच्याबरोबर इकडे पहा." आवाज आल्याच्या दिशेनी सगळे पाहत होते. समोर फादर आणि जॉन होते. मग सगळे त्या डोंगरच्या माथ्यावर पोहोचले. तिथे झाडांखेरीज काहीच नव्हते. मग फादरनी एका ठिकाणी बोट दाखवले. लोकांनी त्या जागेवरची झाडे हटवून खोदायला सुरवात केली. त्या ठिकाणी एक चौथरा होता. तो फोडताच तो भाग पुन्हा खचून तिथे खड्डा पडला. तो एक मोठा हॉल असावा. पूर्वीचे अंनिसचे चर्च. त्यात एक शवपेटी होती. फादर त्याला हात लावणार तोच त्यातून हसल्याचा आवाज ऐकायला आला. ती पेटी उघडली जाऊन त्यातून अनिस बाहेर आला. तो अतिशय क्रूर दिसत होता," मूर्ख लोकांनो ! तुम्ही इथे येऊन माझं काम सोपं केलं आहे. मला आता इथेच मेजवानी मिळणार. " तो म्हणाला. " तू आमचं काहीच बिघडवू शकत नाहीस. खूप घाबरलो तुला. आता तुझा नाश करणारच." लोक एकजुटीने बोलले. अनिस म्हणाला ," बघू तुमचा धीर किती टिकतो ते !"  त्यानी भयानक रूप धारण केले. त्याचे सुळे बघून लोक थरथर कापायला लागले. लोक घाबरलेत हे जॉनने पहिले. अंनिसचे लक्ष लोकांकडे आहे हे पाहून जॉनने धीर करून तो उभा असलेल्या शवपेटीला हातातल्या मशालीने आग लावली. अंनिसने जोरात किंकाळी फोडली. आगीपुढे तो काहीच करू शकत नव्हता. थोड्याच वेळात जो जाळून खाक झाला. लोकांनी आनंदाने जल्लोष केला. तिकडे एका बाजूला दोन सांगाडे पडले होते. ते पाहताच जॉनची आजी आक्रोश करू लागली. ते जॉनच्या आई-वडिलांचे होते. तिने त्यांच्या हातातल्या वेडिंग रिंगवरून ते ओळखले होते. सुंदर पहाट होत होती. इतक्यात एक मुलगा ओरडला "ते बघा काय ?" लोक तिकडे बघू लागले. दोन पऱ्या त्या डोंगरावरून उडत गेल्या. लोकांनी फादरना विचारले ," फादर ऑगस्टाईन त्यांचं काय झालं पुढे ? त्यांचे काहीच अवशेष सापडले नाहीत." फादर हसत म्हणाले," फादर ऑगस्टाईन कायम या गावाच्या संरक्षणासाठी होते. फक्त तुमच्या एकजुटीची गरज होती." असे बोलून ते पहाटेच्या प्रकाशात एका शुभ्र तेजोवलयत विलीन झाले. लोकांनी गुढगे टेकून त्यांना अभिवादन केले.  

त्या गावात दुसऱ्या दिवशी हॅलोविन दणक्यात साजरा झाला. आता जॉन दर रविवारी सिमेट्रीत जातो. तिथे त्याच्या मॉम आणि डॅडच्या थोम्बजवळ फुले ठेवतो. मेणबत्ती लावतो. चर्च मध्ये आता अंनिसचा नाही तर फादर ऑगस्टाईन चा फोटो आहे.अनिसच्या डोंगरावर सुंदर चर्च बनणार आहे.   त्या गावाचे नाव अनिस बदलून फेरी असे ठेवले आहे जॉनने आपले सगळे आयुष्य लोकांसाठी द्यायचे ठरवले आहे. तो फादर ऑगस्टाईनच्या पावलावर पाऊल टाकून फादर बनणार आहे.

आता दरवर्षी त्या गावात हॅलोविन खूप आनंदात  साजरा होतो. कोणत्याही भीतीशिवाय.

समाप्त           

सौ. संपदा राजेश देशपांडे

हॅलोविन Halloween

संपदा देशपांडे
Chapters
हॅलोविन