Get it on Google Play
Download on the App Store

!! हरवलेले प्रेम !!

आजी- आजोबांचे प्रेम!
त्याला बासुंदीची गोडी
त्यांच्या प्रेमासाठी आम्ही मुले वेडी........

''आजी होतीच माझी दुसरी आई
प्रेमळ त्या विठूची रखुमाई."

सकाळच्या वेळी स्वच्छ नऊवारी साडी नेसून,मोठे लाल चुटुक कुंकू  लावलेली,सदा हसमुक असणारी अशी स्री म्हणजे माझी आजी.आजकाल कुटूंब छोटी होत चाललेली दिसतात."हम दो हमारा एक"या उक्ती प्रमाणे.नोकरी निमत्त किंवा व्यवसायासाठी आई वडिलांना बाहेर गावी राहावे लागते त्यामुळे मुलांना आजी आजोबांच्या प्रेमाला मुकावे लागते.

तिच्या बटव्यामुळे आरोग्य तर गोष्टीमुळे बालपण समृध्द झालं माझ्या आयुष्याच्या गोष्टीतलं महत्वाचे पात्र आहे ती म्हणजे आजी.आजी प्रत्येकाला का हवी तर संस्कार करायला,संध्याकाळी श्लोक शिकवायला,झोपताना गोष्टी सांगताना,माया करायला, छान छान खाऊ घालायला, कुठे लागले तरी हळूवार फुंकर घालायला आणि मलम पट्टी करायला घरात आजी हवीच. तिच्या शिवाय कुटूंब आणि आयुष्य अपूर्ण आहे.आई बाबा रागावले की खुशाल आजीच्या मागे दडण्यासाठी आजी ही हवीच. पण संध्याकाळच्या वेळी शुंभ करोती आणि रामरक्षा जर का राहिली तर मात्र खैर नाही. आजीचे चविष्ट पदार्थ म्हणजे शेंवती,मासवडी,थालपीठ, धिरडे, वरणफळ,पुरण पोळी लाजवाब होते पण आता हे पारंपरिक पदार्थ नामशेष होताना दिसतात.

"आ" म्हणजे आयुष्यभर कष्ट करून मुलांचे आणि नातवांचे संगोपन करतो."जो" म्हणजे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. "बा"म्हणजे बालपण हे म्हातारपणाचे दुसरे रूप असते जे नातवंडांना खेळविण्यात त्यांचे लाड पुरवण्यात जातं.पाठीवर घोडा घोडा करण्यासाठी, खाऊला पैसे देण्यासाठी,खूप खूप प्रेम करण्यासाठी, चांगले संस्कार करण्यााठी,खेळ खेळण्यासाठी, गाणी म्हणण्यासाठी,ओंजळ भरून चॉकलेट देण्यासाठी आणि बाहेर फिरायला घेऊन जाण्यासाठी आजोबां इतकी हक्काची व्यक्ती कोणीच नसते.

नातू म्हणजे आजोबांच्या आयुष्यातील सगळ्यात शेवटचा बेस्ट फ्रेंड.नातवा नंतर कोणीच बेस्ट फ्रेंड होत नाही आणि आजोबा म्हणजे नातवाच्या आयुष्यातील पहिला बेस्ट फ्रेंड जो शेवटच्या श्वासापर्यंत नातवाचाच मित्र असतो.

आजी आजोबा हे ताटातील लोणच्यासारखी असतात थोडे काळ सोबत असतात पण जीवनाची गोडी वाढवतात.खूप नशीबवान असतात ते ज्यांचे आजी -आजोबा आजही त्यांच्या सोबत आहे.

मुलांना काही क्षण आजी - आजोबा सोबत घालू द्या त्यांना प्रत्येक गोष्ट Google वर नाही भेटणार.

श्री.गोसावी अतुल.
फोन नंबर:- ८९७५९०२०११

अतुल गोसावी यांचे लेख

अतुल गोसावी
Chapters
!! मैत्री !! !! हरवलेले प्रेम !! !! स्वप्न !!