Get it on Google Play
Download on the App Store

दही खाण्याचे फायदे

आयुर्वेद

निरोगी शरीरासाठी दररोज आहारात वाटीभर दही घ्या

आहारात दह्याचा वापर हजारो वर्षांपासून करण्‍यात येत आहे. दह्यात प्रोटीन्‍स, कॅल्शियम, रायबोफ्लेवीन, व्हिटामीन बी, ही पोषकतत्वे आढळतात.

दात आणि हाडे मजबूत राहण्‍यासाठी दुधापेक्षा दह्यामध्‍ये 18 टक्‍क्‍यापेक्षा जास्‍त कॅल्शियम असते. दह्यामुळे दात व हाडे मजबुत राहतात.

पचन शक्‍ती वाढते :- उन्‍हाळ्यात आहारात दह्याचा वापर केला तर उष्‍णतेचा वाईट परिणाम शरीरावर होणार नाही. शरीरातील अशक्‍तपणा दह्यामुळे कमी होतो.

आतड्याचे आजार :- आहार तज्‍ज्ञांनी सांगितले आहे की प्रत्‍येक दिवशी आहरात दह्याचा वापर केला तर आतड्याचे आजार होत नाहीत.

हृदयाचे आजार :- उच्‍च रक्तदाब, फुफ्फुसाचे आजार, याशिवाय हृदयात वाढणारे कॉलेस्‍ट्रॉलचे प्रमाण नियंत्रीत ठेण्‍याचे काम दह्यामुळे होते.

हाडाचे आजार :- दह्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्‍यामुळे हाडाच्‍या पोषणासाठी मदत करते. दात आणि बोटाची 'नख' दह्यामुळे मजबुत होतात.

सांधे दुखी :- दह्यामध्‍ये थोडे हींग मिसळून खाल्‍ल्यानंतर सांधे दुखी, गुडघे दुखी यासारखे आजार राहतात.

वजन :- सडपातळ व्‍यक्तिने रोज आहारात दह्यासोबत खोब-याचा बाकुर आणि बदाम सेवन केल्यास वजन वाढवता येते.

सौंदर्य :- दही शरीरास लावून स्‍नान केल्‍यानंतर त्‍वचा सुदंर आणि मुलायम होते. दह्यात लिंबाचा रस मिसळून शरीरावर लावल्‍यानंतर रंग उजळतो. दह्यात मध टाकून खाल्‍ल्‍या नंतर सौंदर्यात भर पडते.