Get it on Google Play
Download on the App Store

अथांग उधाणलेले...!! (कविता)

तुला नाही समजणार माझ्या मनाची अवस्था,
वादळ घोंघावत आहे आतल्या आत.
मी कुठेच दिसत नाही मला,
ना तुझ्यात ना माझ्यात.

बोलूनच केलेस तू तुकड्या तुकड्यांमध्ये मला बेहाल,
आता काय उरणार माझ्याकडे माझे असे अस्तित्व.

निशब्द निष्प्राण आहोटी ला मी लागले आता,
नको सुकाणू तुझा ना तू जवळ असल्याचा भास.

किनाऱ्यावर उभी मी,सागर अथांग डोळ्यात साठलेला,
शाश्वत अशाश्वत ,सारे काही अनाकलनीय नुसताच आभास.

लाटांवर येणारी जाणारी लाट,पुन्हा पुन्हा किनाऱ्या कडे धाव,
मी ही अशीच काहीशी नजरेत तुझ्या शोधला होता माझा ठाव.

क्षणभंगुर होते सारे ,ती आतुरता ती ओढ ती प्रेमाची गाज,
नव्हतेच नाते काही आपल्यात मग काय सांगू जगास त्या नात्याचे नाव.

आतल्या आत उसळी मारू पाहतेय माझ्या मनातलं वादळ
कुठे कशी शान्त होऊ कसा भरून निघेल भावनांचा खळ.

संगीता देवकर..