Get it on Google Play
Download on the App Store

भातुकलीचा खेळ मांडते..

भातुकलीचा खेळ खेळते लाडकी लेक लहान ..
गंमतजंमत करता करता संसार मांडते छान ...

खेळामधले राजाराणी असले जरी सान ..
हसतमुखाने जपत असतात एकमेकांचा मान ...

छकुली करी नित्यनेमाने स्वयंपाक स्वादिष्ट ..
नवरोबा पण करी जेवण चवीने अगदी मस्त ...
गोड गोड संसारात असते मात्र निरागस प्रत्येक गोष्ट ..
नवऱ्याला पर्वाच नसते मुळी जेवणात मीठ कमी पडले की जास्त ..

चिमुकला नवरा आपल्या राणीला पदोपदी जपत असतो ..
ती चुकली तर तिच्यावर खोटेखोटेच चिडत असतो ..
रडू लागते राणी जेव्हा एका कोपऱ्यात बसून ..
क्षमा करी राजा तिला तिच्या डोळ्यातील पाणी पुसून ..

कौतुकाने पूर्ण करत असतात एकमेकांच्या इच्छा ..
नसतात कसलेच बंध .. नसतात कसल्याच अपेक्षा ..

हरकत नसते जरी टाकला खेळ हा अर्ध्यावरती ..
नसते तिथे प्रेमाने जपलेला संसार मोडण्याची भीती ..
तो रोज नव्याने थाटण्याची असते वेडी धुंदी ..
नसते कुणाचीच मनाई ..नसते कसलीच बंदी ...