Get it on Google Play
Download on the App Store

द व्हाईट टायगर- NETFLIX

 

कथानक

          ही कथा एका श्रीमंत भारतीय कुटुंबासाठी काम करणाऱ्या महत्त्वाकांक्षी ड्रायव्हरची आहे. गरीबीतून वर उठण्यासाठी  आणि उद्योजक होण्यासाठी तो आपली धूर्त बुद्धी वापरतो. प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव अभिनीत ‘द व्हाइट टायगर’ 22 जानेवारीला जागतिक स्तरावर नेटफ्लिक्स मार्फत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाचा  नवा ट्रेलर शेअर करताना रिलीजची तारीख जाहीर केली.रामिन बहरानी हे अमेरिकन-इराणी चित्रपट निर्माते- दिग्दर्शक आहेत. आदर्श-गौरव हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.. हा चित्रपट अरविंद अडीगाच्या The white tiger नावाच्या मॅन बुकर पुरस्कारप्राप्त कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव समृद्ध जोडप्याच्या भूमिकेत दिसलतील, जे अमेरिकेतून आपल्या व्यवसायासाठी परत आल्यानंतर आपल्या कुटुंबासमवेत भारतात वास्तव्यास आले आहेत. त्यांचा ड्रायव्हर बलराम हलवाईची भूमिका आदर्शने केली आहे.ट्रेलरच्या  सुरुवातीला बलराम आपला प्रवास आणि यशस्वी उद्योजक होण्याच्या स्वप्नांबद्दल सांगतो.अशोकसाठी (राजकुमार) काम करण्याची इच्छा देखील व्यक्त करतो.जेव्हा स्वत: ची चामडी वाचवण्यासाठी जोडपे (प्रियंका आणि राजकुमार) रोड अपघाताच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तो बंडखोरी करतो.एमी पुरस्कारप्राप्त चित्रपट निर्माता एवा ड्युवर्ने यांच्याबरोबर प्रियांका देखील कार्यकारी निर्माता म्हणून या प्रोजेक्टमध्ये  आहेत.

रिलीज डेट 22 जानेवारी,२०२१

कलाकार : राजकुमार राव , प्रियांका चोप्रा , आदर्श गौरव.

source: https://indianexpress.com/article/entertainment/web-series/the-white-tiger-trailer-priyanka-chopra-starrer-explores-india-class-struggle-netflix-6907370/