उमलत्यांचे अंतरंग.!
आपलं दुःख बोचरं कि इतरांचं सुख हे एकदा कळलं कि झालं आत्मपरीक्षण .....!!
पौंगडावस्थेतील मुलां संदर्भातील काही बातम्या पाहण्यात आल्या तर काही मिळालेले स्वअनुभव....मग ठरवलं मांडू काही मनातले ...
' आपण जे जग मुलांना दाखवणार तेच ते जगणार बघणार..जे बोलणार तेच बोलणार .....लहानांनी मोठ्यात मोठ्यांनी लहानात लक्ष घालू नये ही मर्यादा शिकवायला हवीच ....तर मुले लहान मोठा यातला फरक ओळखतील इतरांविषयी बोलताना ही आदराने वागतील ..सध्या .अशी गरज खरच वाटते....!?
आत्मपरीक्षणाची खरच गरज आहे ??
पौगंडावस्थेतील मुलांमधे शारिरीक, मानसिक, सामाजिक भावनिक स्थितंतरे फार जलद गतीने होतात वर्तन अस्थिर परिस्थितीशी समायोजन करणे कठीण केवळ मुलांनाच नव्हे तर पालकांनाही याला कुणाला दोषी मानायचे ?? हा प्रश्न आर्थिक विवंचना अनेक कोटुंबिक सामाजिक कारणे ...मुले अनुकरणप्रिय असतात आपल्या समवयस्कामधे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनाहूतपणे त्यांच्या कडून अप्रिय घटना घडत असतात.
अहंकार या वयात संवेदनाक्षम असतो भावनिक कोंडमा-याच्या स्थितीत अनेक चुका घडतात वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष होते आपली स्वपने प्रत्यक्षात कशी आणावी याबाबत ती साशंक असतात त्यांना जसे वाटते तसे त्यांना जगता येत नाही. अन् मनातले सांगता ही येत नाही मग मुले गट करतात त्यातून अनेक गोष्टी शिकत असतात त्यांचे आदर्श ठरतात आपण प्रौढ आहोत याची जाणीव होते वाईट संगतीत गुन्हेगारी व्यसनाधिनता याकडे वळतात.कारण या वयातील मैत्री समान आवड-निवड समान कृती समान आचरण यावर आधारित असते विचारांची देवाणघेवाण होते निर्णयक्षमता वाढते हट्टीपणा वाढतो ...पण अशावेळेसच त्यांच्या विचारात बदल होणे गरजेचे चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करुन देणे यात पालक समाज प्रसारमाध्यमे शिक्षक तर उत्तमताच देण्याचा प्रयत्न करतातच.
सध्याचे युग " वापरा व फेका" संस्कृती चे मग यात आपण आपली मूल्ये फेकून देत आहोत का ??विचार होण्याची गरज....
केवळ मुलांनाच दोषी न मानता आपण कुठे आहोत हा विचार हवा स्री-पुरुष दोघेही कमावणारे स्पर्धेच्या मागे धावणे भागच ...घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले घर सजवण्याच्या नादात घरपण ही हवेच..बडेजावात राहणं गरजेपेक्षा जास्त श्रीमंती ...दिखावा...यामगे धावताना देखीला ... मुलांचे लहानपण जपण्याचा प्रयत्न हवा ...ज्ञान मिळवण्याची ओढही कमी होताना दिसते मग केवळ शिक्षकांना दोषी धरुन चालेल का ??
आई वडील होताना .... "पालकत्व" ....घेता येणे ही महत्वाचे ..तशी काळजी प्रत्येक जण घेतोच ..पण केली जाणारी धावपळ योग्य दिशेने हवी.सकारात्मकदृष्टीने केला जाणारा विचार हितकारक ठरेल.
मनुष्याला शांतता प्रियच यासाठी तो प्रयत्नशील असतो पण ज्यामुळे समाज बनतो त्या कुटुंबातच अशांतता ....समाजात उंचीने शक्तिने श्रीमंतीने मोठी झालेली माणसे आहेत पण मनाचे काय?? घरातच हा जवळचा हा लांबचा हा दुजाभाव आपण करत असतो.
घर मोठे सर्व सुखसुविधांनी मढलेले पण हे सर्व उपभोगण्यासाठी वेळ मात्र कमी ...अनेक विषयांचे ज्ञान आपल्याकडे आहे मात्र परिस्थीतीचे भान ठेवण्याचे आपण विसरतो ?? स्वतःचे आत्मपरीक्षणच हे बदलू शकते.
क्षणिक आनंदाच्या क्षणांनी आपण मोहास बळी पडतो.इतरांपेक्षा मी कसा सरस हे दाखवत हीच भावना नकळत आपल्या पाल्यांत रुजवतो ..आणि जगण्यातले छोटे छोटे आनंद त्यांच्या कडून हिरावतो ...शिक्षण घेणे पैसे कमवण्यासाठी च हीच बीजे रोवताना ..तुलनेची छटा त्यांच्या वाढीवर परिणाम करते ती आत्ममग्न होतात.
सुसंवाद, सकारात्मकता ,संस्कार.. या तीन बिंदूवर पाल्याची वाढ अवलंबून असते तरच पुढील आयुष्य इच्छा, प्रयत्न ,अनुभूति या जगण्यातील मुख्य धारांवर ते यश मिळवू शकतील.
डिजीटलायजेशन काळाची गरज पण त्यामुळे भावनिक संवाद स्पर्श कमी होत चाललाय...संगणक मोबाईलच्या इमोजीसारख्या केवळ काही बटनांवर आपल्या भावना आडकू लागल्यात ....भरभरुन पाठीवर हात ठेवत शाब्बास !!म्हणही मुलं विसरतील का ?? संवेदना बोथट होत केवळ कृत्रिमतेकडे चंगळवादाकडेच मुलं वळत चाललीयेत .मग.मुलांना दोष कसा देता येईल??
एकमेकांशी आपण बोलतो खरे पण यातही जिव्हाळा??? ..कि केवळ व्यव्हार ....आपला मनातला प्रत्येक विचार गोष्ट विकल्याशिवाय तुमचे अस्तित्व नगण्य ठरते .तो किती जणांना आवडतो ...आवडावा पुन्हा यासाठी आपणच तो विकत राहयचा ..मग यात ही..सगळे अधांतरीच...हे सिद्धच प्रत्येकाचे मूल्य ठरलेले मग त्यावरुन तुमचा आदर ही ठरलेला .:हे सगळं ...मान्यच असेलच..मनाला हे पटत नाहीच ....पण अशी विचारसरणी ठेवणारे मागेच राहतात.त्यात पुन्हा दोष त्यांचाच....फार अवघड ...मनाला न पटणारेच.... ज्ञानाच्या विस्फोट झाला खरा पण विद्यार्थी खरा ज्ञानार्थी झाला का ?? असे अनेक प्रश्न ...यावर विस्ताराने बोलता येईल..
मग आपण आपला चरितार्थ चालवायला शिकलो पण खरचं जीवन जगायला शिकलो ??मग आपली मुले जीवनाचा खरा आनंद कशात शोधणार??मुलांना छोट्यातला छोटा आनंद घ्यायला शिकवायला हवा...परिस्थिती सतत बदलते कालचे आज नाही आजचे उद्या ...!!!
पालक ,समाज ,शाळा ,मुले या सर्वच परिस्थितीच्या ताब्यातील घटक पण सामावून घेण्याची क्षमता, संयम, निग्रह, आवड आणि प्रेरणा ही मूल्ये रुजवत निर्माण करता येते. कुणी एक हे करु शकणार नाही सर्व घटकांचा परिणाम..अपेक्षित ...
घरातल्या भल्या बु-या वातावरणाच्या परिणामांमुळे मुलांचा नैतिक भावनिक सामाजिक विकास होतो.शालेय जीवनात शारिरीक बौद्धिक तर सामाजिक वातावरणात चालिरीती रुढी परंपरा नैतिक आचार वृतपत्रे प्रसारमाध्यमे आता सोशलमिडीया याचाही साधकबाधक प्रभाव मुलांवर पडतो.स्वतःत बदल आत्मपरीक्षण याची गरज ....सुसंस्कृत पणा शिक्षणाने भावी पिढीत अशा मूल्यांच्या साथीने ..बदल स्वतःत स्वतःसाठी स्वतःमार्फत स्वतःच करायला हवा.
पान उलटून पुढे जायचं कि परिवर्तन घडवायचे निवड ज्याची त्याचीच मुले हीच खरी संपत्ती..हेच फलित ..मग अशा उमलत्यांचे अंतरंग जाणीवा जपायला हव्यात. त्या जिव्हाळ्याने ..करावं का आत्मपरीक्षण??.!!
सहजच मनात आलेले तुमच्या माझ्या मनातील मांडण्याचा प्रयत्न ..पटले तर ....!!
व्यक्ती सापेक्षता आदरच...!!
©मधुरा धायगुडे