Get it on Google Play
Download on the App Store

जॉर्जेट बाउरडॉर्फ

जॉर्जेट बाउरडॉर्फ ही वीस वर्षिय मुलगी होती. जॉर्जेट अतिशय भाग्यवान होती कारण अवघ्या विसाव्या वर्षी ती एका तेल कंपनीची एकमेव वारसदार होती. तीचे हे भाग्य फार काळ टिकु शकले नाही...  ती वीसच वर्षांची होती तेंव्हा तिचा खुन झाला होता.

ती कॅलिफोर्निया मधील वेस्ट हॉलीवुड येथे राहायची आणि तिचे बाबा, तिची सावत्र आई व सावत्र बहिण हे सगळे न्यु यॉर्क शहरात राहायचे. जॉर्जेट तिचा वेळ घालवायला जवळच्या हॉलीवुड कँन्टीन मध्ये वेट्रेसच काम करत असे. तिला तिथे श्रीमंत आणि सुप्रसिद्ध लोकांबरोबर नाचताना आणि मैत्री करताना पाहिले गेले होते. त्या कँन्टीनच्या अकाउंटंटने पोलिसांना सांगितले की जॉर्जेटचा बॉयफ्रेंड याच कँटिनमध्ये साधा पोर्‍या होता. तो एल पेसो शहरात रहायचा. नंतर पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले की तो वास्तविकता  कुण्या श्वेतवर्णिय माणसाचा वैयक्तिक गुलाम होता. त्याचे खरे नाव एम.ब्राऊन शिकागो, ईलिनॉय मध्ये रहात होता. जॉर्जेटचा खुन होण्या आधी तिने त्याला एल पेसोला जाण्यासाठी विमानाचे तिकिट खरेदी करुन दिले होते.

जॉर्जेटच्या हत्येच्या एक रात्र आधी ती काम संपवुन नेहमीप्रमाणे आपल्या घरी गेली. त्याच दिवशी सकाळी ती आपल्या वडिलांच्या पर्सनल सेक्रेटरी रोज गिलबर्टला दुपारच्या जेवणाच्या वेळी जवळच्याच एका हॉटेलात भेटली होती. तिने तिच्या बरोबर काही खरेदीही केली. जॉर्जेटच्या खुनानंतर जेव्हा मिसेस रोज गिलबर्टला जॉर्जेटच्या त्या दिवशीच्या मुडबद्दल विचारणा केल्यावर रोजने जॉर्जेट काळजी किंवा चिंतेत नव्हती. या उलटपक्षी ती त्या दिवशी खुपच आनंदात होती हे सांगितले. पोलिसंच्या अंदाजानुसार त्या खुनाच्या भीषण रात्री जॉर्जेटची वाट पाहत कुणीतरी तिच्या घराजवळ उभे होते. तिच्या हल्लेखोराने घराच्या वर्‍हांड्यातला बल्ब काढुन अंधार केला होता. नंतर तपासात त्या बल्बवर बोटांचे ठसे सापडले होते.

पोलिसांना जॉर्जेटचे शव तिच्या बाथरुममध्ये सापडले. तिच्या अंगावरचे दागिने आणि तिच्या किमती वस्तु जश्याच्या तश्या होत्या. त्य़ाला खुन्य़ाने स्पर्शही केला  नव्हता. मात्र तिच्या पाकिटातुन पैसे चोरण्यात आले होते. कदाचित यामुळे तिचा खुन चोरीच्या उद्देशाने झाला आहे असे भासवले गेले होते. तिचे शव बाथटबमध्ये खाली तोंड करुन पडलेले होते. तिच्या तोंडात टॉवेल खुप खोलवर कोंबला होता. कदाचित त्यामुळेही तिचा मृत्यु झाला असेल. तिच्य़ा घराती दोन-चार डॉलरच्या नोटांचे बंडल आणि बरेच चांदिचे सामान जसेच्यातसे होते. त्याच दिवशी जॉर्जेटच्या सावत्र बहिणिची गाडी तिच्या नेहमीच्या जागेवरुन हरवली होती. नंतर तिच गाडी लॉस एँजिलीस शहराजवळ मिळाली. कदाचित त्यातले पेट्रोल संपल्यामुळे ती गाडी कुणीतरी तिथेच सोडुन पळ काढला होता. ज्यांनी जॉर्जेटचे शवविच्छेदन केले त्यांनी आणखी काही खुलासे केले. जॉर्जेटच्या खुना आधी तिने खुन्याबरोबर झाटापट केल्याचे दिसत होते. तिच्या शरीरावर मारामारीचे घाव होते. नंतर तिला दोरीने बांधुन ठेवले आणि तिच्या तोंडात टॉवेल कोंबलेला होता. तो अगदी तिच्या घश्यापर्यंत गेला होता. जॉर्जेटच्या खुनानंतर बर्‍याच कामगारांना विचारणा केली पण काही ठोस पुरावा सापडला नाही त्यामुळे कुणालाही अटक झाली नाही.