Get it on Google Play
Download on the App Store

थेलमा टॉड

थेलमा एलीस टॉड हिला “हॉट टॉडी” म्हणूनही ओळखले जायचे.

१९२०ते १९३० च्या काळात ती हॉलिवूडमध्ये अभिनेत्री होती. थेलमा स्वतःच्या कॅफेच्या वरच्या एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिचा कॅफे रुसवेल्ट हायवेच्या फुटपाथजवळ चालवत होती. कॅफेपासून थोड्याच अंतरावर, थेलमाचे एक गॅरेज होते.

१५ डिसेंबर, १९३५ रोजी थेलमा तिच्या पॅकार्ड कन्वर्टीबलच्या स्टीयरिंग व्हीलच्या मागे या गॅरेजच्या आत मृताव्स्थेत आढळली. त्यावेळी काहीजणांचा असा अंदाज होता की, गॅरेजमध्ये तिने आत्महत्या केली आहे किंवा चुकून स्वत:ला तिने गाडी चालू करताना ठार मारले आहे. मात्र, काही वेळाने हिंसेची चिन्हे समोर आली. थेलमाच्या तोंडात रक्त होते आणि कारला रक्ताचे काही डाग होते तसेच, कारच्या दारावर रक्ताचे डाग होते.

थेलमाच्या रक्तातील दारूची पातळी खूपच जास्त होती. ती इतकी जास्त होती कि कुणाच्या आधाराशिवाय थेलमा चालूही शकली नसती. त्यात ती तीनशे पावले  शिवाय जरा जरासे चढावर असलेल्या तिच्या या गॅरेजपर्यंत नक्कीच पोहोचू शकत नव्हती. शिवाय  तिने त्यादिवशी उंच टाचेचे सँडल घातली होती. असे निष्कर्ष असूनही, थेलमा निराश होती, कधीकधी आत्महत्या विचारही तिने केल्याचे बोलले गेले होते. अद्याप तिच्या मृत्यूच्या वेळी केलेल्या हिंसेच्या खुणांचा समावेश असल्याचे तथ्य दिसून येते,

परंतु दुर्दैवाने थेलमाच्या त्या गॅरेजमध्ये त्या दुर्दैवी दिवशी  खरोखर काय घडले?

हे कोणालाही कळू शकणार नाही. यामुळे सगळी तथ्ये बाजूला ठेवून तिची केसही एक बाजूला पडून राहिली