Get it on Google Play
Download on the App Store

मित्र-मैत्रिणीचे प्रकार

आपण नवीन मित्र-मैत्रिणी बनवण्याचा विचार करीत असल्यास आपल्याला कोणत्या प्रकारचे मित्र बनवायचे आहेत हे मनात ठरवावे लागेल. सांगायचे तर, तीन प्रकारचे मित्र-मैत्रिणी आहेत:

  • ओळखमात्र मित्र-मैत्रिणी:-  

हे तुमच्या शाळा किंवा व्यवसायाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये असतात. जेव्हा तुम्ही त्यांना पाहता  तेंव्हा त्यांना अभिवादन करता. हाय म्हणता किंवा नुसतेच स्मित देता. दिवसाच्या शेवटी आपण अलविदा किंवा बाय म्हणता, त्यांच्या बाबतीत ही असेच असते. ते तुमच्याशी कामापुरतेच बोलतात, काही संदर्भ आपल्यास तेवढ्यापुरते संबंध टिकवतात. परंतु अशी नाती फार काळ टिकत नाहीत. म्हणजेच जेव्हा आपण शाळेतून पदवीधर होतात किंवा कामाची जागा सोडता. तेंव्हा ते आपल्यापासून दुरावतात.

  •  रोजचे मित्र:-

हे मित्र-मैत्रिणी आपल्या शाळेत, कॉलेजात, कामाच्या ठिकाणी किंवा आपण जिथे राहतो तिथे राहतात. यांच्याशी रोजचं बोलणं होतं. पण तरीही तुम्ही त्यांना घरी आल्यावर कट्ट्यावर भेटता. कधी कधी शनिवार-रविवारी  एकत्र भेटून मजा करतात. पण त्यांचा संबंध आपल्या आयुष्यात फक्त इतकाच असतो. ते तुमच्या सुख दुखत सामील होत नाहीत. ते फक्त तुमच्याशी गप्पा मारायला आणि हँगआउट्स साठी भेटतात.

 

  • खरे किंवा सर्वोत्तम मित्र-मैत्रीण:-

ज्यांच्याशी तुम्ही अगदी काहीही आणि सर्वकाही बोलू शकता. तुम्ही दररोज भेटता किंवा नाही भेटत शिवाय आपण किती वारंवार भेटता यावर आपल्या मैत्री निश्चितच कमी होत नाही. यामुळे काहीच फरक पडत नाही. जेव्हा ही आपल्याला त्यांची किंवा त्यांना आपली  आवश्यकता असते तेंव्हा आपण विश्वासाने एकमेकांना सांगू शकता. तेव्हा आपण एकमेकांसाठी किहिती मैलाचा प्रवास करता.

तुमच्यापैकी बरेच जण साधे किंवा खरे मित्र-मैत्रिणी बनवण्यासाठी धडपडत असतात. तुमच्याकडे बहुतेक ओळखमात्र मित्र असतील.  जे तुम्ही मोजू ही शकत नाही.

माझे ओळखमात्र मित्र,  सामान्य मित्र आणि खरे मित्र यांचे प्रमाण सुमारे ६०-३०-१०% इतके आहे. बऱ्याच वर्षांमध्ये मी जास्तीत जास्त लोकांना भेटलो आहे. या वर्षांमध्ये हे प्रमाण ७५-२०-५% इतके अधिक झाले आहे. मला असे वाटते की हे प्रमाण जवळजवळ ५-१०% च्या तफावतीने  इतर लोकांसाठी देखील सारखेच असावे.

तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा कि तुम्हाला फक्त ओळखमात्र किंवा चांगले मित्र-मैत्रिणी बनवायचे आहेत इतकेच नाही. परंतु ते ही महत्त्वाचे नाही, आपण ते करू शकता.तुम्हाला कदाचित माझ्यावर विश्वास बसणार नाही, परंतु मी माझ्या प्राथमिक आणि माध्यमिक शालेय वर्षांमध्ये एक शांत आणि अंतर्मुख मुलगा होतो. मी ज्युनियर कॉलेजमध्ये होतो तेव्हा लोकांशी अधिक मोकळेपणाने  बोलण्यास सुरुवात केली. तरी मी माझ्या वैयक्तीक जीवनात एकांत जीवनशैली राखली होती.  मी विद्यापीठात प्रवेश घेतला आणि नंतर माझ्या कामाच्या ठिकाणी म्हणजे माझ्या कंपनीमध्ये मला अधिक मनमोकळे बनवले. 

आज मी बुकस्ट्रकवर अनेक पुस्तकं लिहितो. इतरांना समोरासमोर बसवून कौन्सिलिंग करतो. मी काही कार्यशाळांमधून प्रशिक्षिण ही देतो. जिथे माझ्या आयुष्यातील बरेच प्रसंग मी इतरांना सांगतो आणि त्यांना सामायिक करतो. लहानपणी भविष्यात मी कुणासारखा होईन? याबद्दल मला माझ्या मोठ्या भावाने विचारले. तेंव्हा मी आजच्यासारखा मोकळा आणि अभिव्यक्त होईन असा विचार ही केला नव्हता. जर तुम्ही आजूबाजूच्या लोकांकडे नजर टाकली तर तुम्हाला कळेल कि ते लोकं तुमचे मित्र सहज होऊ शकतात  आपण वेळ आणि सरावाद्वारे अधिक मनमोकळे व्हायला शिकू शकता.

 नवीन मित्र-मैत्रीण मिळविण्यासाठी माझ्या वैयक्तिक टीपा या पुस्तकात दिल्या आहेत.