Get it on Google Play
Download on the App Store

जाणीव...

काय,कुणास सांगु मी,
आपलेचं नाक नकटे आहे,
आपलेचं जग ,
आपणचं एकटे आहे,

दाखवू कसा,मोकळी वाट मी,
वाटेत आपल्याचं काटा आहे,
दुख:त जगाच्या या ,
आपलाही निम्मा वाटा आहे,

पोटाला या छोट्याशा ,
पैशाची भूक आहे,
होत आहे जे काही , 
त्यात माझीही चूक आहे,

म्हणावं कसा कुणाला,
भ्रष्ट्राचारावर माणसांचा    
जोर आहे,
दिसला तो फसला,
पणं चोरीतला या
मी देखील चोर आहे....

भ्रष्ट्राचारात या 
माझाही छळ आहे,
आपल्या छळाची
मीचं जळ आहे ,

तलवारीच्या टोकाची
मीचं धार आहे,
जे घडते त्यात
माझाही हातभार आहे,

काय सांगु कुणा,
जो तो ,
आपल्यातचं गुणी आहे,
दंगलीत मेलेल्यांचा ,
मी देखील खूणी आहे,

शेतक-याच्या बन्यानाचा
मीचं भोंक आहे,
काय सांगु कुणा मी
मीचं बिनढोंक आहे,

पैशात अडकला ,
जीव आहे, 
स्वत:तल्या चोराची 
मला कुठं जाणीव आहे..

-महेश नामदेव तिवाडे

मराठी कविता

महेश नामदेव तिवाडे
Chapters
जाणीव... शेतकरी आजचं सत्य....