व्यवहार
तिकडे युरोपात कुठेतरी एक मनुष्य राहत असे. त्याच्याकडे करोडो सुया होत्या. इतक्या कि त्या सुया एखाद्या दरी मध्ये टाकल्या तर ती दरी भरून जाईल.
मग एक दिवशी येशू ख्रिस्ताची आई त्याच्याकडे आली आणि म्हणाली, “ माझ्या मुलाचा सदरा फाटला आहे. तो मंदिरात जाण्यापूर्वी मला तो शिवून द्यायचा आहे. तू मला एक सुई देतोस का?”
त्याने तिला सुई देणार नाही असे निक्षून सांगितले. तशी ती निघून जाऊ लागली. तर त्याने तिला थांबवून घेतले आणि तो तिला बांड्या गोष्टी शिकवू लागला.चांगले तासभर तिला ‘व्यवहार’ या विषयावर व्याख्यान दिले.
येशू ख्रिस्ताच्या आईने ते व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले आणि नंतर ती निघून जाऊ लागली.
तेव्हा तो मनुष्य तिला म्हणाला, “ आता मी तुला जे काही सांगितले ते व्याख्यान जाऊन तुझ्या मुलाला ऐकव.”