श्री वरेण्यपुत्र गणपती, राजूर, जालना
या गणपतीची ख्याती पुत्रप्राप्तीसाठी नवसाला पावणारा जागृत गणेश अशी आहे.
वरेण्य राजाची पट्टराणी पुष्पिका हिने बारा वर्षे गणेशाचे तप केले होते.
तिने ज्याठिकाणी तप केले, तेथे गणेशने प्रकट होऊन बालभावाने रहाण्याचे वचन दिले होते.
हे गणेश मंदिर एका उंच टेकडीवर असून प्राचीन हेमाडपंथी आहे.
या मंदिरात भक्तांनी दिलेले नवसाचे तेल नंदादीपास साठी वापरले जाते. हा नंदादीप सदैव तेवत असतो.
मुंबईहून जालन्याला जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास केल्यास ४३५ किलोमीटरचे अंतर आहे.
जालना आणि जळगाव रस्त्यावर सुमारे सव्वीस किलोमीटरच्या अंतरावर हे गणपतीचे मंदिर आहे.