Get it on Google Play
Download on the App Store

नरकंकाल

“नर कंकाल, सापळा! भूत...भूत”


"काय?" मी चमकलो


“होय. सांगाडा हाय तिथं. येक न्हाय तर तीन तीन सांगाडे!”


सर्व कामगारांची हवा टाईट झाली होती. प्रत्येकाचे चेहरे भीतीने पांढरे फटक झाले होते. उत्खननाच्या कामात कोणीही पुढे जाण्यास तयार नव्हते. त्यावेळी मी पुरातत्व खात्यात नव्याने नियुक्त झालो होतो आणि पहिल्यांदाच कोकणच्या त्या अतिशय दुर्गम जंगली भागात माझ्या मार्गदर्शनाखाली उत्खननाचे काम केले जात होते. महादू त्या भागाचा कंत्राटदार होता. तो जंगल तोडण्याचा ठेका घेत असे. त्याने खोदण्यासाठी तीस चाळीस मजुरांची व्यवस्था केली होती.


बोलण्याच्या ओघात  महादूनी सांगितले होते की, “ती टेकडी भुताळी आहे आणि त्यावर रात्री बेरात्री प्रेतात्मे भटकतात. टेकडीला लागूनच वेताळाचे मंदिर आहे, असे ऐकिवात आहे की अमावास्येच्या काळोख्या रात्री सर्व आत्मे तेथे जमतात आणि नाच करतात धिंगाणा करतात.


मग अत्यंत हळू आवाजात महादू शेवटी म्हणाला  - "साहेब! जर तुम्ही इथे खोदकाम नाय केल्यानी तरच ते चांगले आहे नायतर मोठा प्रोब्लेम होऊ शकतो. अहो, भूतखेत आहेत ना  ती शेवटी!!”

महादूचे शब्द ऐकून मला हसू आले. मी म्हणालो, "लोक प्रत्येक ठिकाणी भुताटकी आहे असं म्हणतात. कोकणामध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे भूत फिरत नाहीत. सर्वत्र भूत आहेत. त्यांच्या भीतीमुळे मी सरकारी काम बंद करू का?” महादू माझ्या बोलण्यावर पुढे काहीच बोलला नाही. तो फक्त मान खाली घालून निघून गेला.