Get it on Google Play
Download on the App Store

दादा हात दे

फार पूर्वीची गोष्ट. एके दिवशी एक भाऊ, बहिण व भावजय अशी तिघे प्रवास करीत होती.
 बहिणीने भावाचा हात धरला होता व खांद्यावर बायको बसली होती.
असा प्रवास करितां करितां वाटेंत जोराने पाऊस पडू लागला. ओहोळ वाहू लागले.
इतक्यांत वाटेत एक पर्ह्या (नाला) लागला.
त्यांतून जात असतां बहीण पाय घसरून पाण्यांत पडली व बुडूं लागली.
ती “दादा हात दे” अशा भावाला हांका मारूं लागली पण त्याने तिकडे बिलकूल लक्ष दिले नाही
व तो बायकोला खांद्यावर घेऊन तसाच चालता झाला.
इकडे बहिण मेली. आतां ती पांखरूं होऊन “दादा हात दे” असे केविलवाणे ओरडत असते.