Get it on Google Play
Download on the App Store

पहिली गोष्ट हा पंधरवडा अशुभ आहे,अशुभ आहे,असे बोलता कामा नये.त्यामुळे पितरांना दु ख होते.एवढेच नव्हे तर तो शुभ आहे असे तुमच्या वर्तणुकीतून दिसले पाहिजे. 

दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जी कांही नवी खरेदी करायची असेल ती शक्यतो या काळात केलेली चांगली.आपल्या मुलाचा,मुलीचा, उत्कर्ष बघून आईवडिलांना,आजोबा आजींना,पूर्वजाना,पितरांना समाधानच वाटणार .

तिसरी गोष्ट आपल्या आई वडिलांना, आजोबा अाजीला, आवडणाऱ्या प्रिय असणार्‍या  गोष्टी केल्या पाहिजेत.मग त्या गोष्टी खाद्य वस्तूंबद्दल असतील,धर्मग्रंथांचे वाचन पठण असेल,गरीबांप्रति कनवाळूपणा असेल,आचरणातील  शुचिता असेल,जे कांही असेल आणि आपल्या मनाला पटेल ते आपण केल्यामुळे पितरांना आनंद होईल.पंधरा दिवस पितरांना आनंदी ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. 

* एकदा माझ्या आईने हे तुमचे सारखे काय चालले आहे म्हणून बाबांना थोडेबहुत झापले.*

त्यावर शांतपणे बाबा इतकेच म्हणाले 

*"विरजण लावण्याचे काम चालू आहे.एक ना एक दिवस आपल्याला दही झालेले दिसेल."*   

(समाप्त)

१२/९/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

पितृ पंधरवडा (पितृपक्ष)

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters