Get it on Google Play
Download on the App Store

भूते पकडणारा तात्या नाव्ही

कोणे एके काळी कोकणात एक तरुण नाव्ही एका छोट्या खेडेगावात राहत होता. त्याचे नाव होते तात्या. त्याला त्याचे केस कापणे आणि दाढी करणे हे काम खूप आवडत असे. लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना तो त्यांच्याकडून अनेक मनोरंजक कथा ऐकायचा.

पण जर एखाद्या माणसाने तात्यासमोर रडगाणे गायले तर तात्या त्याचे पैसे परत करत असे आणि म्हणे,

"हे पैसे तुमच्याकडेच ठेवा. या पैशांची गरज माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आहे." त्यामुळे तात्या अनेकदा रिकाम्या हाती घरी येत असे.

त्यानंतर तात्याने दुसऱ्या गावात जाण्याचा निर्णय घेतला कारण त्याला वाटले की अनोळखी लोकांकडून पैसे घेणे त्याला सोपे जाईल. मग त्याने हत्यारांची पिशवी उचलली आणि दुसऱ्या गावाकडे मजल दर मजल करत जाऊ लागला. एके रात्री चालत असताना तात्या एका वटवृक्षाखाली बसला. दुपारचे ऊन वाढत होते म्हणून तो त्या झाडाखाली पहुडला आणि त्याचा डोळा लागला. त्याला तिकडेच खूप गाढ झोप लागली आणि रात्र होईपर्यंत तो जागा झालाच नाही.

त्या झाडावर एक भूत राहत होतं. रात्री जोरजोरात तात्या घोरु लागला, भूत लगेच झाडावरून खाली उतरले आणि हसायला लागले आणि मोठ्याने ओरडू लागले,

"हा! हा! हा! आज रात्री मला जेवणात एक स्वादिष्ट पदार्थ मिळणार आहे."

भुताचा आवाज ऐकून तात्याला जाग आली. तात्या खूप घाबरला होता. पण त्याने पटकन विचार केला आणि तोही मोठ्याने ओरडला,

"हा! हा! हा! मला तुझी भीती वाटत नाही, मी भूत पकडणारा नाव्ही आहे!"

मग तात्याने त्याच्या पिशवीतून आरसा काढला आणि भूताच्या समोर ठेवला.

"हे बघ, हे भयानक भूत मी नुकतेच पकडले आहे. मी तुला आता पकडतो आणि तुला माझ्या पिशवीत त्याच्याबरोबर ठेवतो. पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. तू कुठेही असशील, माझी पिशवी तुला शोधून काढेल."

भूताने आयुष्यात यापूर्वी कधीही आरसा पाहिला नव्हता. त्यामुळे त्याला स्वतःचे प्रतिबिंब ओळखता आले नाही.

"तात्या दादा, तुम्ही जे सांगाल ते मी करेन, पण कृपया मला त्या भयंकर भूताबरोबर तुमच्या पिशवीमध्ये डांबून ठेवू नका."

तात्या त्यावर म्हणाला,

"ठीक आहे मी आज रात्री तुझ्या झाडाखाली झोपणार आहे. सकाळपर्यंत तू मला सोन्याची एक हजार नाणी आणून दे नाहीतर मी तुला माझ्या पिशवीत डांबून ठेवीन."

भूताने तात्याच्या पिशवीकडे एक नजर टाकली आणि ते खूपच घाबरले. त्याने लगेच धूम ठोकली.

जेव्हा तात्या सकाळी उठला तेव्हा भूताने त्याला एका मडक्यात एक हजार सोन्याची नाणी दिली.

"शाब्बास! माझी आणखी एक इच्छा तुला पूर्ण करावी लागेल. माझ्या घरा शेजारी एक मोठे कोठार बांध आणि उद्या सकाळपर्यंत ते भाताने पूर्णपणे भर. तरच मी तुला माझ्या जादूपासून मुक्त करीन."

"उद्यापर्यंत हे करणे शक्य होणार नाही," भूत गयावया करत म्हणाले.

"माझ्या आदेशाचे त्वरित पालन करा, नाहीतर तू आयुष्यभर माझ्या पिशवीत सडत पडशील."

हे ऐकून भूत खूप घाबरले आणि तिकडून निघून गेले .

घरी परतल्यानंतर, तात्याने त्याच्या पत्नीला एक हजार सोन्याची नाणी भरलेले मडके दाखवले. तात्याने भुताची संपूर्ण कहाणी त्याच्या पत्नीला कथन केली. तात्याची बायको आनंदाने म्हणाली

"तुमच्या बुद्धिमत्तेवर मी खूप खूश आहे.चला, आता आपले गरिबीचे दिवस संपतील."

त्या दिवशी भूताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप कष्ट केले. आणि गोदाम बांधून पूर्ण केले. गोदाम बनवल्यानंतर त्याने एक एक करून त्यात तांदळाची पोती भरली.

जेव्हा भूत गोदाम बांधत होते, तेव्हा त्याचे काका तिथे आले. भूताच्या काकांनी संपूर्ण आयुष्यात इतके घाबरलेले भूत पाहिले नव्हते. भुताचे काका मोठ्याने ओरडले,

"मुर्खा, हे तू काय करतोस?"

भूत दचकले त्याने इकडेतिकडे पहिले आणि तात्या जवळपास नसल्याची खात्री करून घेतली मग हळूच ते काकांच्या कानात कुजबुजले,

"हळू बोला काका! या घरात एक खूप शक्तिशाली माणूस राहतो. तात्या नाव्ही! तो भूते पकडण्यात प्रवीण आहे. मला आज संध्याकाळपर्यंत त्याचे काम पूर्ण करायचे आहे, नाहीतर तो मला त्याच्या पिशवीत कायमचा कैद करेल मला त्या पिशवीत कैद व्हायचे नाही कारण आधीच एक भयंकर भूत त्यात कैद आहे. "

भित्र्या पुतण्याचे बोलणे ऐकून त्याच्या काकांला खूप राग आला.

"अरे गाढवा, तुला माहीत नाही का कोणतीही मानवी शक्ती आपल्यावर काम करत नाही. तू चल आता माझ्याबरोबर. आपण त्याण तात्याला चांगला धडा शिकवू. मग तो भूतांचा योग्य आदर करायला शिकेल."

त्यानंतर दोन्ही भुते तात्याच्या घराच्या खिडकीतून डोकावले. मग भूताचा काका खूप जोरात ओरडला आणि म्हणाला,

"हा! हा! हा! आज मी ह्या माणसाला खाऊन टाकेन! चल पुतण्या, एकत्र फडशा पाडू. पण त्याआधी त्याला चांगले शिजवूया."

पण हे ऐकून तात्याच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता किंवा भीती दिसली नाही तेव्हा काका भूत खूप आश्चर्यचकित झाला. मग तात्या पुतण्या भूताला म्हणाला,

"तू माझ्या आज्ञेचे पालन केले आहे आणि सर्व काम केली आहेस म्हणून तू आता मुक्त आहेस." मग तात्याने काका भुताकडे पाहिले आणि म्हणाला

"आता तुझ्या ऐवजी मी हे भूत माझ्या पिशवीत कैद करून ठेवतो."

हे ऐकून काका भूत खूप चिडला. तो ओरडला. 

"तुझ्यासारख्या मूर्ख माणसाची माझ्यासारख्या भुताशी अशा शब्दात बोलण्याची हिंमत कशी झाली?"

मग तात्याने त्याचा सर्वात मोठा आरसा काकाच्या भुताच्या चेहऱ्यासमोर ठेवला आणि तात्या ओरडला

"तुला या भूताबरोबर राहायला आवडेल का?".

काका भूत त्याच्या पुतण्या सारखाच बिनडोक होता. तो आणखीनच

"तात्या दादा, तुम्हाला जे पाहिजे ते करा, पण त्या भयंकर भूताबरोबर मला तुमच्या पिशवीत डांबून ठेवू नका. मी तुमच्यासाठी दोन हजार सोन्याच्या मोहरा आणीन. एक मोठा वाडा आणि दुकान बांधून देईन"

तात्या म्हणाला, "ठीक आहे! जर तू तसे केलेस तर मी तुला सोडून देईन."

काका भूतानी तात्याला दिलेले वचन पूर्ण केले. तेव्हापासून, काका भूत आणि त्याचा पुतण्या कधीच त्या तात्याच्या वाटेला गेले नाहीत.

तेव्हापासून तात्या आपले उर्वरित दिवस त्याच्या दुकानात आनंदाने केस कापणे, दाढी करणे आणि लोकांच्या मनोरंजक कथा ऐकण्यात घालवू लागला. आता तो गरजूंना सहजपणे मदत करू शकत होता याचा त्याला खूप आनंद झाला.

 

 

भूते पकडणारा तात्या नाव्ही

महाकाल
Chapters
भूते पकडणारा तात्या नाव्ही