Get it on Google Play
Download on the App Store

वृश्चिक

वृश्चिक राशीचे लोक बिनधास्त, धैर्यवान, जिद्दी आणि  स्पष्टवक्ते असतात. कोणत्याही विषयाची बारकाईने छाननी करण्याची क्षमता या लोकांमध्ये असते. पण या लोकांना राग आला तर त्यांना शांत करणं कठीण होऊन बसतं. अनेक गोष्टींबाबत त्यांच्यात सहनशीलतेची भावनाही असते.

पॉजिटिव्ह

या वर्षी तुम्हाला नवीन काही संधी मिळू शकतात. न्यायालयीन प्रकरणे किंवा सरकारी प्रकरणे काही त्रासानंतर मार्गी लागतील. विद्यार्थी अभ्यासाबाबत पूर्वीपेक्षा अधिक गंभीर होतील. संशोधन, विज्ञान, वकिलीशी संबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. भावनिक राहण्या ऐवजी व्यावहारिक राहून आपले उपक्रम राबविल्यास यश मिळेल. नवीन वाहन खरेदीचे योग   निर्माण होतील. उसने घेतलेले पैसे परत करण्याच्या योजना यशस्वी होतील.

निगेटिव्ह

या वर्षी आर्थिक बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. खर्च जास्त होईल त्यामुळे बजेट सांभाळणे महत्त्वाचे आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना त्यातील सर्व बाबींचा विचार करा. एखाद्या लहान मोठ्या चुकीचा फटका तुम्हालाही सहन करावा लागू शकतो. अपत्यांच्या लग्नाची किंवा करियरची चिंता असेल. ड्रग्ज आणि वाईट सवयींपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. जवळच्या एखाद्या नातेवाइकाचा अपघात होण्याचीही शक्यता असते.

व्यवसाय

व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देतील. तसेच स्टाफ किंवा कर्मचाऱ्यांचे योग्य सहकार्य राहील. कोणतेही पेमेंट किंवा उधारीचे पैसे अडकलेले असतील तर ते मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मात्र प्रतिस्पर्धी समस्या निर्माण करतील. नोकरीत बढती किंवा पदोन्नतीची संधी मिळेल. हे वर्ष परदेशात जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांसाठी सकारात्मक शक्यता घेऊन येणार आहे.

प्रेम

कौटुंबिक बाबींमध्ये सामंजस्याचा अभाव दिसून येऊ शकतो. पती-पत्नीने एकमेकांच्या भावना आणि वर्तनाचा आदर केला पाहिजे. मित्रमंडळ संख्या वाढेल. मानसिक आणि आर्थिक मदत देखील होईल. प्रेमसंबंधांचे लग्नात रूपांतर करण्यासाठी कुटुंबीयांचीही मान्यता मिळेल.

आरोग्य

या वर्षी तुमचे आरोग्य चांगले राहील. ऋतूकालोद्भव समस्या त्रास देऊ शकतात. काळजीपूर्वक आणि नियमित दिनचर्येने तुम्ही निरोगी राहाल. घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या बिघडत चाललेल्या तब्येतीबद्दल चिंता वाटू शकते. त्यांची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.