प्रक्षेपण आणि कार्य
या टेलिस्कोपची रचना आणि बांधकाम २०१६च्या उत्तरार्धात पूर्ण झाले. या टेलिस्कोपवर एक विस्तृत चाचणी करण्याचा टप्पा सुरू झाला तेंव्हा २५ डिसेंबर २०२१ रोजी कौरौ, फ्रेंच घाना येथून एरियन ५ प्रक्षेपण वाहनाद्वारे लॉन्च करण्यात आले आणि सत्तावीस मिनिटांनंतर वरच्या टप्प्यातून सोडण्यात आले. नासाने या प्रक्षेपणाचे वर्णन "निर्दोष" आणि "परिपूर्ण" असे केले आहे. जानेवारी २०२२ पर्यंत, दुर्बिणीची हळूहळू चाचणी केली जाइल आणि त्याच्या लक्ष्यित स्थळापर्यंत प्रवास करताना त्याच्या कार्यप्रणालीची यंत्रणा उलगडली जाणार आहे. हा टेलिस्कोप प्रवास करताना गती मंद करेल, आणि एल २ या ठिकाणावर पोहोचण्यासाठी कक्षेत प्रवेश करण्याच्या आवश्यक वेगासह चालत राहील.
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचे वस्तुमान हबल स्पेस टेलिस्कोपच्या वस्तुमानापेक्षा अर्धे आहे. वेब स्पेस टेलिस्कोपचा एकूण आकार हबलच्या अडीचपटापेक्षा सहापट जास्त आहे. यामुळे टेलिस्कोपची वास्तविक प्रकाश गोळा करण्याचे क्षेत्र हबलच्या संकलन क्षेत्रापेक्षा ५.६ पट मोठे आहे. बेरिलियम हा एक अतिशय कठोर व हलका धातू आहे. जो अनेकदा एरोस्पेसमध्ये वापरला जातो. हा धातू चुंबकीय नसतो आणि अति-थंड वातावरणात आपले मुल स्वरूप हा धातू बदलत नाही. या धातूवर सोन्याचा मुलामा चढवल्यामुळे इन्फ्रारेड किरणांसाठीची परावर्तकता आणि टिकाऊपणा प्रदान करतो.