Get it on Google Play
Download on the App Store

जमिनीवर चालणारी नाव

फार फार पूर्वी एका देशांत एक राजा राज्य करीत होता. त्याला एक फार सुरेख मुलगी होती. ती फार लाडकी होती त्याची. तिच्यासाठी त्यानें तऱ्हेत-हेच्या वस्तू जमविल्या होत्या. तसल्या गोष्टींची त्याला फार आवड होती. सर्व तऱ्हेनें सुखी होता तो राजा. पण राजा म्हटला की त्याला काही तरी चिंता असावीच लागते. ह्या राजाला काही नाही तर जमिनीवर चालणाऱ्या एका विचित्र नावेचीच चिंता होती. त्या साठी त्याने ठिकठिकाणचे सुतार बोलावून आणले. शास्त्रज्ञांची मदत घेतली. परंतु तें काही शक्य झाले नाही. शेवटी राजाने जाहीर केले की जो मला जमिनीवर चालणारी नाव आणून देईल त्याला मी बक्षीस देईनच आणि शिवाय माझी मुलगी देऊन अर्धे राज्य हि पण देईन.

त्या गांवाच्या बाहेर एक जंगल होतें. त्यांत एक लाकुडतोडया राहात असे. त्याला तीन मुलगे होते. त्यांतील मोठ्या मुलाला राजकुमारी बरोबर लग्न करण्याची इच्छा झाली. म्हणून एक दिवस तो खांद्यावर कुऱ्हाड टाकून बरोबर शिदोरी घेऊन जंगलांत गेला. तेथे एक मोठेसें झाड पाहून त्याने ते तोडण्यास आरंभ केला. दुपारपर्यंत झाड तोडून तो न्याहारी करण्यासाठी बसला. त्याने आणलेलें गाठोडे सोडले. एवढयात तेथे एक चिमणी आली. ती त्याच्या समोर येऊन बसली व म्हणाली

“मला पण थोडी भाकरी दे रे...!"

“जा, जा, तुला कोण देतो." तो म्हणाला.

"बरं ते जाऊ दे. ह्या झाडाचे काय करणार आहेस?" चिमणीने विचारले.

"करीन वाटेल तें. तुला काय त्याचें..? वाटलं तर पलंगावे पायच करीन...!” लाकूडतोड्या म्हणाला.

त्याबरोबर चिमणी “पलंगाचे पाय” म्हणत उडून गेली. न्याहारी केल्यावर लाकुडतोडया पुन्हां आपल्या कामाला लागला. कापून ठेवलेल्या खोडावर त्याने कुऱ्हाड मारली. त्याबरोबर त्यांतून पलंगाचा पाय निघाला. त्याला आश्चर्य वाटले. पुन्हां त्याने दुसरा घाव मारला. पुन्हां जो तुकडा निघाला तो हि पलंगाचाच पाय. एकेक घावाबरोबर एकेक

पलंगाचा पाय खाली पडू लागला. शेवटी त्याला राग आला. पण करणार काय संध्याकाळ पर्यंत त्या सर्व खोडांतून निघालेले पंलगाचे पाय घेऊन तो घरी गेला.

“कोठपर्यंत आली नाय?" घरी गेल्याबरोबर भावंडांनी विचारले.

“जाऊ. देरे कोण करतो त्या मुलीशी लग्न?" तो म्हणाला.

दुसऱ्या दिवशी दुसरा मुलगा कुहाड घेऊन निघाला. बरोबर शिदोरी बांधून घेतली. आणि जंगलांत गेला. एक चांगले जाडजूड झाड पाहून तो तें तोडू लागला. दुपारपर्यंत खोड तोडून आडवें पाडले व नंतर न्याहारीला बसला. त्याने शिदोरी सोडली असेल नसेल तोच त्याच्या कानांवर शब्द आले.

“मलाहि दे थोडीशी भाकरी."

त्याने बर पाहिले तर त्याला एक चिमणी दिसली.

“चल, चल, तुला नाही मिळत. मोठी आली आहे मागणारी.” तो म्हाणाला.

"बरं तें राहू दे. तूं या एवढ्या मोठ्या झाडाचे काय करणार आहेस.” चिमणीने विचारलें.

"करीन काय पाहिजे तें. तुला काय करावयाचे आहे..! मी रवी करणार आहे.”

“काय म्हणणे आहे तुझें ?" तो शेतकरी म्हणाला.

ते ऐकतांच चिमणी.

"रवी रवी" म्हणत भुर्रकन उडून गेली.

खाणे झाल्यावर थोडा वेळ विश्रांति घेऊन लाकूडतोड्या कामाला उठला. कुऱ्हाड हातात घेऊन लाकडावर घाव घातला. त्याबरोबर जो लाकडाचा तुकडा उडाला तो सखी होऊन पडला. त्याला ते पाहून आश्चर्य वाटले. ही काय गंमत आहे म्हणून त्याने आणखी एक लाकडाचें छक्कल उडविलें. तें हि रवी होऊन पडले. तो लाकूड तोडत गेला आणि इकडे रव्यांचा ढीग वाढत गेला. त्याला नाव बनवावयाची होती, पण एक सुद्धा तुकडा मनासारखा निघत नव्हता. जो निधे तो रवी होऊन पडे. तो केटाळला.

शेवटीं संध्याकाळपर्यंत झाल्या तेवढ्या रत्या घेऊन घरी गेला.

“काय झाली का नाव?" भावांनी विचारलें.

"जाऊं दे रे, कोण पडतो त्या भानगडींत.” तो म्हणाला.

तिसऱ्या दिवशी तिसरा मुलगा जंगलांत निघाला. शिदोरी बांधून घेतली. कुऱ्हाड खांद्यावर टाकली आणि पोहोचला जाऊन रानांत. त्यांत एक मोठे जाडजूड झाड पाहून तें तोडू लागला. दुपारपर्यंत खोड तोडून खाली पाडले आणि तो न्याहारीसाठी बसला, सांवलीत बसून गाठोडे सोडले. त्याच वेळी त्याला चिमणीचा आवाज ऐकू आला. ती म्हणाली,

“मला थोडी भाकर दे.”

“ह्यांत तुझासुद्धा वाटा आहे ये.” असे म्हणत त्याने खुशीनें चार तुकडे विखरून टाकले.

चिमणीने ते सर्व टिपले. मग पंख फडफडवीत त्या तोडलेल्या खोडावर बसून म्हणाली,

"होय, पण या खोडाचे तूं काय करणार आहेस?"

"जमिनीवर चालणारी नाव करणार आहे. पण ती कशी करावी हे लक्षात येत नाही." तो म्हणाला.

"जमिनीवर चालणारी नाव" असें ओरडत चिमणी उडून गेली.

खाणे झाल्यावर विश्रांति घेऊन लाकूडतोड्या कामाला लागला. लाकडावर पहिला घाव घालतांच त्याचे एक छकल निघालें आणि नावेचा एक भाग होऊन पडले, दुसरा घाव घातला, दुसरा भाग होऊन पडला. असें होता होतां संध्याकाळ होईपर्यंत नाव

"तयार झाली. खरोखरच ही नाव चालेल का? हे पाहाण्यासाठी तो नावेत बसला. वल्हें हातात घेऊन "नाव चालली माझी पुढती!" म्हणून वल्हवू लागला.

तर झाडांच्या मधून वाट काढीत ती भराभर जाऊ लागली. थोडे दूर गेल्यावर त्याला एक माणूस दिसला. तो हाडांचा ढिग समोर घेऊन बसला होता आणि ती चघळत होता.

"काय रे हाडे कां चघळतोस..!" नाववाल्याने विचारलें.

"काय करुं रे? किती खालें तरी पोटच भरत नाही. जवळचा सर्व पैसा खाण्या पिण्यांतच खर्च झाला.” तो मनुष्य म्हणाला.

"तर मग चल माझ्याबरोबर मी राजवाड्यात जात आहे. तेथे तुला वाटेल तेवढे खायला मिळेल." नाववाला म्हणाला.

तो मनुष्य नावेत बसला. नाव पुढे चाल लागली. थोडें दूर गेल्यावर दुसरा एक मनुष्य भेटला. तो कालव्याला तोंड लावून पाणी पीत होता. कालव्याचे पाणी कमी होत होते.

"कोण रे बाबा तूं ! असे काय पाणी पीत आहेस ?" त्याने विचारले. “तहानच भागत नाहीं त्याला काय करणार, शक्य होतें तोपर्यंत दारू प्यालो.”

“आतां पाणी पिण्याची वेळ आली, पाणी पितों आहे." तो म्हणाला.

“चल माझ्याबरोबर राजवाड्यांत" म्हणून लाकूडतोड्याने त्याला नात घेतले.

पुढे गेल्यावर त्याला एक मनुष्य दिसला. तो मोठमोठ्या झाडांची भली मोठी मोळी बांधून खांद्यावर घेऊन चालला होता.

"हे रे काय हे? हे सारे जंगलच घेऊन कोठे चालला आहेस?" नाववाल्या लाकुडतोडयाने विचारले.

"किती हि लाकडे तोडून आणली तरी माझ्या सावत्र आईला पुरतच नाहीत. मला फार राग आला माझ्या सावत्र आईचा. म्हणून आज मी ही एवढी लाकडे येऊन जात आहे." तो म्हणाला.

“चल माझ्याबरोबर. तुला जरा सुद्धा मेहनत करावी लागणार नाही. मी राजाकडे जातो आहे." लाकूडतोड्या म्हणाला.

त्या माणसाने एक झाड काठीसारखे बरोबर घेतले आणि नावेत बसला. नाव पुढे चालू लागली. थोड्या वेळाने त्याला आणखी एक माणूस भेटला. तो आकाशाकडे तोंड करून जोराने फुंकर घालीत होता.

“हें काय..!" त्याला नाववाल्याने विचारलें.

“मालकाच्या शेतांत अजून धान्य तसेच पडले आहे आणि आकाश तर भरून आले आहे. म्हणून ढगांना मी फुंकर घालीत आहे. जिवापाड कष्ट केले तरी मालकाचे काळीज काही विरघळत नाही. एक दाणा हि जास्त उचल देत नाही." तो म्हणाला.

“मग कशाला करतोस अशी नोकरी. चल माझ्याबरोबर राजाकडे. मी तिकडे जात आहे." असे म्हणून लाकूडतोड्याने त्याला नावेत घेतले व पुढे निघाला.

लाकूडतोड्या आपल्या या चार मित्रांना घेऊन राजाकडे गेला.

लाकुडतोड्या म्हणाला,”जमिनीवर चालणारी नाव घेऊन आलो आहे. ती पहा तिथे आहे."

राजाने ती नाव जमिनीवर आणि पाण्यांत चालवून पाहिली. त्याला पाहिजे होती तशीच अगदी ती नाव होती.

"वा! छान आहे. मला जशी पाहिजे होती तशीच आहे ती. याची योग्य किंमत तुला देवू करवितो. काळजी करूं नकोस." राजा म्हणाला.

"योग्य किंमत म्हणजे काय? आपण तर म्हणाला होता आपली मुलगी आणि अर्धे राज्य देईन. ते द्या." लाकूडतोड्या म्हणाला.

राजाला ते आवडले नाही. राजकुमारांना सोडून लाकूडतोड्याच्या गळ्यांत बांधणार का मी आपली मुलगी? असा विचार केला.

तो म्हणाला, "आम्ही म्हटले होते खरे तसें, पण आतां तो बेत बदलला आहे. अजून सुद्धा माझ्या कोठारांत खूपसे जुनें धान्य पडले आहे. ते संपल्यावर नवें धान्य आल्यावर मुलीचा विवाह करण्याचे ठरविले आहे."

“त्यांत काय! मी करतो तें संपविण्याचे काम." त्याने त्या खादाड माणसाला राजाच्या कोठारांत पाठविलें. क्षणार्धात त्याने ते रिकामें केलें.

"घ्या...! मागवा धान्य आणि करा लग्न करण्याची तयारी. संपले तुमचे जुनें धान्य." तो म्हणाला.

“धान्य संपविणे काय मोठेसें..? जा रे, त्या पिपांतील दारू पिऊन टाक..." राजा म्हणाला.

नाववाल्याने ताहानलेल्याला आज्ञा दिली. तो ती सर्व संपवून हंसत आला.

म्हणाला, "आज आत्मा शांत झाला."

राजाला त्या लाकूडतोड्याचा फार राग आला. त्याने आपल्या सैन्याला बोलावून त्या सर्वांना हाकलून देण्यास सांगितले. सैन्याला पाहून लाकूडतोड्याने आपल्या जंगली मित्राला इशारा केला. बरोबर आणलेलें झाड लाठीसारखें फिरवीत त्यानें सैन्याला उधळून लावलें. राजाचा राग मस्तकांत जाऊन पोहोचला. त्याने आपल्या घोडदलाला बोलावून त्या पांचांचे पारिपत्य करण्यास सांगितले. ते येताच फुंकर घालणाऱ्या मित्राला पुढे जाण्यास सांगितले. त्याने सर्व सैन्याचा समाचार घेतला. आपण सुद्धा यांत उडून जाऊं की काय असे वाटून राजाने घाबरून आपल्या मुलीचे लग्न लाकूडतोड्याशी लावून दिले आणि म्हटल्याप्रमाणे अर्धं राज्य पण दिले.

लाकूडतोड्याने आपल्या मित्रांना मंत्र्यांच्या जागा देऊन आनंदाने राज्य केलें.

जमिनीवर चालणारी नाव

कथाकार
Chapters
जमिनीवर चालणारी नाव