Get it on Google Play
Download on the App Store

"बंधो विदुर, गांधारी देविंची प्रकृती आता कशी आहे?" प्रज्ञाचक्षु राजा धृतराष्ट्र याने विचारले.

"आता ठीक आहे."

"अचानक पोटात कसं दुखायला लागलं?"

"गांधारी देवींनी रागाच्या भरात पोटावर प्रहार केले, त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत होते. जेव्हा गर्भवती स्त्रिया अविचारीपणे काही तरी विचित्र वागतात, तेव्हा मग दुसरे काय होणार?" विदुर याने सांगितले.

"बिचारी गांधारी! दु:खी नाही होणार तर काय करणार? विदुर, तू माझा भाऊ आहेस, म्हणून मी तुला माझे विचार सांगतो. दोन दिवसापूर्वी कुंतीला सूर्यासारखा तेजस्वी मुलगा झाल्याची बातमी आली तेव्हापासून गांधारी झोपलेली नाही.” धृतराष्ट्र हताशपणे म्हणाला.

"पण ती चांगली बातमी होती!" विदुर म्हणाला.

"विदुर, तुझ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पांडूच्या पहिल्या पुत्र रत्नाचा जन्म झाला याचा मलाही आनंद आहे. पण गांधारी? ती आज दोन वर्षांची गरोदर आहे. जर प्रसूती नऊ दहा महिन्यांतच झाली असती. तर कौरव राज्याचा युवराज गांधारीच्या पोटी जन्माला आला असता. पण कुंतीला पहिला मुलगा झाल्याने ती निराश होणार नाही तर काय ? धृतराष्ट्राने विचारले.

"ते आता कोणाच्या नियंत्रणात आहे का? पोटावर मारण्याचे कारण काहीही असो, पण मला माहीत आहे की माझ्या पोटाला एकदा मार लागला होता तेव्हा खूप दुखत होते." विदुर म्हणाला.

"पण आता वेदना कमी झाल्यात ना?"

"वेदना कमी झाल्या आहेत. हात मारला त्या वेळी तीव्र वेदना होत होत्या, पण त्यानंतर पोटातून लोखंडाप्रमाणे कडक मांसाचा गोळा बाहेर आला होता." विदुर म्हणाला.

"काय? कडक मांसाचा गोळा?

"अगदी! कडक लोखंडी मांसाचा गोळा."

"मांसाचा गोळा? गांधारीला शंभर पुत्र होण्याचे शंकराचे वरदान मिळाले होते ना?"  धृतराष्ट्राने विचारले.

"पण तिच्या वाट्याला आले ते माझे पाप असणार नक्कीच?"

"देवी गांधारी तो मांसाचा गोळा फेकत होती इतक्यात तिला दैवी दृष्टांत मिळाला की............."

"दैवी दृष्टांत?" धृतराष्ट्राने अधीर होऊन विचारले,

 

"कोणाचा दृष्टांत?"? शंकराचा की ब्रह्मदेवाचा? काय होता तो सल्ला?"

"त्या मांसाच्या तुकड्यावर थंड पाणी टाकत राहिल्यास त्या मांसाचे शंभर तुकडे होतील असा सल्ला त्या दृष्टांतात दिला होता."

"असं ! मग?"

"मग ते शंभर तुकडे तुपाने भरलेल्या भांड्यात अत्यंत काळजीपूर्वक ठेवावेत. कालांतराने प्रत्येक तुकड्यातून एक मुलगा जन्म घेईल.”

"आश्चर्याची गोष्ट आहे . हे महापुरुष कसे वरदान देतात आणि कशी भरभराट होते हे काय कोडे आहे समजत नाही. मग त्यांनी सांगितलं तसे सगळे तुम्ही केले?" धृतराष्ट्राने विचारले.

"हो, लगेचच. असे करताच तो मांसाचा गोळा तुकडा शंभर भागात विभागला आहे आणि ते सर्व तुपाच्या भांड्यात ठेवून मी आलो आहे." विदुर यांनी सांगितले.

"बरोबर शंभर भाग झाले?"

"हो, बरोबर शंभर. मग देवीना मुलगीही हवी होती, म्हणून शंभर भागांतून जे छोटे तुकडे शिल्लक राहिले होते ते मिसळून एक भाग बनवला आणि त्यातून एक मुलगी जन्माला येईल असे वाटते." विदुर यांनी सांगितले.

"हे सगळे केव्हा जन्माला येतील?"

"जेव्हा दोन पूर्ण वर्षं होतील तेव्हा”

"आणखी दोन वर्षे लागतील, तोपर्यंत पांडूच्या घरी आणखी एक राजकुमार जन्माला येईल. पण विदुरा, तुला एक गोष्ट विचारू?" धृतराष्ट्र म्हणाला.

"महाराज, अगदी आनंदाने विचारा" 

"विचारतो... पण ही गोष्ट गुप्त ठेव. आपल्या कुळात ज्या राजपुत्राची गर्भधारणा प्रथम झाली तो राज्याचा खरा वारस मानला जातो की प्रथम जन्माला आलेला? माझ्या मते मात्र केवळ पांडूचे पुत्रच आपल्या राज्याचे वारस आहेत, यात शंका नाही; पण गर्भधारणेचा काळ मोजायचा असतो का कि तो विचारात घेतला जात नाही? कि कसे? धृतराष्ट्राने शंका व्यक्त केली.

"महाराज, हा प्रश्न कसा काय पडू पडतो. आता आता भांड्यात ठेवलेले मांस आहे त्याचे बालकांत रुपांतर होणे बाकी आहे." विदुर यांनी सांगितले.

"मी फक्त विचारले. एकतर मला डोळे नाहीत, मग मी कुठे काय पाहू शकतो? आणि असेही जोपर्यंत भीष्म पितामह आहेत तोपर्यंत मी काय तू काय काळजी करून काय उपयोग? हा एक विचार नुसता माझ्या मनात आला आणि मी तुला सांगितला. याला फारसा काही अर्थ नाही." धृतराष्ट्र खुलासा करू लागला.

"माणूस कधीच काही अर्थ असल्या शिवाय बोलत नाही. आपल्याला जे अर्थहीन वाटतं, त्यातही अर्थ दडलेला असतो आणि कधी कधी त्याचा खूप गंभीर अर्थ असतो. मात्र होय, ऐकणाऱ्यामध्ये हा अर्थ काढण्याची ताकद असायला हवी." विदुर म्हणाला.

"बंधो विदुर, तू जाऊन पुन्हा गांधारी देवीची बातमी घेऊन ये ना? तुला इथे येऊन बराच उशीर झालाय." धृतराष्ट्राने विषय बदलून टाकला.

"ठीक आहे महाराज, मी जातो.

धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन

अक्षय मिलिंद दांडेकर
Chapters