Get it on Google Play
Download on the App Store

हरवत चाललीयेत माणसं .....!!!

कुठला निरोप शेवटचा ठरेल हे सांगता येत नाही सोडून चाललीत माणसं आपली परकी असं काही नाही एकदंरच मानव एवढाच एक सत्य.....

का कोणास ठाऊक माणसं न सांगता भराभर सोडून चाललीत एकमेकांना .. कित्येक स्वप्न तशीच सोडून. ढगाआड !!समाधान असणारी जुनी माणसं पटापट काळच्या पडद्याड जाताना बघून मन हेलावले आणि व्यक्त व्हावेसे वाटले...

माणसं हरवत चाललीयेत हो कारण आत्मा अमर शरीर सोडून जाते ...म्हणून ...

ढगा आड गेलेला माणूस परत येत नाही. 

सध्याच्या या परिस्थितीत आधार तरी किती कुणाला द्यायचा असा प्रश्न ...जगण्याचा हा सोहळा अर्धवट टाकून आपले प्राण गमावल्यांची संख्या वाढत चाललीये ,.चुकले कुठे आणि काय असे असंख्य अनुत्तरित प्रश्न ...

माणूस गेल्यानंतर माणसं हळहळ करतात. पण हयात असताना हीच माणसं एकमेकांना बाजूला करतात.

सत्ता, संपत्ती, अहंकार, ईर्ष्या, स्पर्धा सगळं किती क्षणिक आहे याचा इतका अनुभव यापूर्वी कधी आला नसेल.

कुठे चूक झाली निसर्गाच्या विरुद्ध जाताना भान विसरत चालले मानवाचे...अती करता करता इति ....!!

आपले प्राधान्यक्रम चुकले का? एकमेकांत एकमेकांशी स्पर्धा करता करता जगण्याशी स्पर्धा करावी लागली .

नको त्या गोष्टीना नको तितकं महत्व देणारी, 
किरकोळ अहंकारासाठी एकमेकांना अगदी बोलणं सोडून देणारी माणसंच ना....शेवटी जे पेरले जाते तेच पुढे उभे ठाकत असावे.ह्या वर विश्वास ठेवावासा वाटतो.

माणसाचा क्षणाचा भरवसा राहिला नाही. 
फुलपाखरा सारखं क्षणभंगुर जगणं झालंय.
त्यामुळे माणूस माणसात असेपर्यंतच माणसांनी माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे.

आडवा येतो मी....!!

मी का कमीपणा घेऊ ?
हे सगळं सोडून आधार, धीर, आनंद दिला-घेतला पाहिजे.
माणसाला समजून घेता यायला हवं ....

माणूस गेल्यानंतर आपण त्याचं कितीही कौतुक केलं, स्टेटस ठेवलं, ...अंतयात्रेत सामील झालो आता अशा काळात तेही एखाद्या च्या नशीबात नसेल ..प्रारब्ध ..रडलो तरीही तो ते कधीच पाहू शकत नाही की त्याला कोणी सांगू ही शकत नाही..गेलेल्या माणसाचे कर्म देखील कारणीभूत असेलही  कुणी कसे ...असे का...हे आपल्या हातात नाही पण आपण कसे वागायचे हे ठरवता येतेच ..... , जिवंत पणी एकमेकांना प्रेम द्या, आधार द्या, मदत दया, दिलासा द्या..  महत्व द्या..

 गेल्यावर हळहळ करून उपयोग नाही..
 
सकारात्मकता,  प्रचंड आत्मबळ इच्छा शक्ती आणि कोटुंबिक भावनिक आधार..साथ ह्या गोष्टी माणसाला आरोग्यसंपन्न ठेवण्यास मदत करतात  ख-या अर्थाने law of action ची...जी सकारात्मकता वाढवेल.माणसाला माणसाशी बांधेल यासाठी संवाद हवा  .माणसाला माणसाशी बांधणारा ....!!

मग मी काय करु शकेन  असा प्रश्न मनात आला तर या सोडून चाललेल्या माणसांकरता हा विचार मनात आला तर हेच यश ...सकारात्मकतेची जाणीव....!!

व्यक्ती सापेक्षता

©मधुरा धायगुडे