तु येना परत
तु येना परत
तु मला हसवणे,मस्तीच्या रंगांत भिजवणे ,अचानक खुप चिडवणे, असं वेड्याला वेड लावणे.
पण मी काही केले तर माझ्यावर रूसने,
तु रूसलेलं मी सिरियस घेतलं तर तु खदाखदा हसणे;
असं मला फसवणे ,लांड्या म्हशीवर बसवणे हा तुझा छंद त्यात मी बेधुंद माझा आनंद जणु क्षणोक्षणी मोगर्याचा सुगंध.
मग आता का झाली हवा बंद, श्वासही पडले मंद
का आणलाय नशिबाने दुरावा? दुष्काळात महिना तेरावा.
कसे जगायचे आता, हाका मारत-मारत
पायाने पुढे चालत पण मनाने मागे वळत ;
तु येना परत
प्लीज येना परत.
पूर्वीसारखे सुख मिळावे म्हणून केले दुसरे प्रेम;
पण चुकली वाट-दिशा हुकला नेम हारली गेम.
पदरात पडले दुःख ;
कळून चुकले कि कोणीच नाही तुझ्यासारखी: तुझ्यासारखी तुच फक्त.
कशी मागू माफी तुझी ?
कशी मागू माफी तुझी मला नाही कळत
पावसासोबत ये , धुक्यासोबत ये कशी पण ये पण
तु ये परत .
प्लीज येना परत.